शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

वैद्यकीय महाविद्यालयांतील १७ पदे होणार नियमित

By admin | Updated: June 8, 2017 06:32 IST

तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत १७ पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागात तसेच शासकीय दंत महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सक या संवर्गामध्ये तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत १७ पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.सेवा नियमित करण्यात आलेल्या पदांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गातील ८ तर दंतशल्यचिकित्सक संवर्गातील ९ उमेदवारांचा समावेश आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतील एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय निवड मंडळामार्फत तात्पुरत्या सेवेने नियुक्त झालेल्या या उमेदवारांना यापूर्वी केलेल्या तात्पुरत्या सेवेचे कोणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत; तसेच शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून त्यांच्या सेवा नियमित होणार आहेत.राज्यात सध्या १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ३ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. शासकीय दंत महाविद्यालये व वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अध्यापकांच्या पदांचे प्रमाण निश्चित करण्यात येते. खासगी वैद्यकीय व्यवसाय आणि खासगी रुग्णालयांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेली स्पर्धा पाहता या दंतमहाविद्यालयांसमोर अनुभवी, निष्णात डॉक्टरांची अध्यापन आणि रुग्णसेवेसाठी कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.