शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया १० जूनपासून

By admin | Updated: June 3, 2016 03:27 IST

प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या १० जूनपासून सुरू होणार आहे. या दिवशी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून

पुणे : प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या १० जूनपासून सुरू होणार आहे. या दिवशी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर पसंती क्रम अर्ज आॅनलाइन भरावे लागणार आहेत. गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना खेळ, एनसीसी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी प्रवेशाबाबतची अधिसूचना काढली असून, संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत माहिती न भरल्यास त्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त गुणांसाठी विचार करण्यात येणार नाही. केवळ चार घटकांसाठीच अतिरिक्त गुणांची तरतूद आहे. फक्त टपालाद्वारे प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त गुणांसाठी विचार केला जाणार नाही. सध्या मूळ प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठवू नयेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान समुपदेशनासाठी बोलावल्यानंतर ही कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक २ ते ५ जून :अतिरिक्त गुणांसाठी आॅनलाइन अर्ज भरणे १० जून : गुणवत्ता यादी जाहीर करणे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकडाउनलोड करता येईल१४ ते ३० जून : राज्यातील चार केंद्रांवर पसंती क्रम अर्ज भरणे६ जुलै : प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर करणे१५ ते २२ जुलै : यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणेप्रवेश पात्रता व गुणवत्ता खालीलप्रमाणे ‘एमएचटी-सीईटी’मध्ये प्राप्त गुणवत्तेनुसार प्रवेशास पात्रसीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.तीनही विषयांमध्ये समान गुण असल्यास जीवशास्त्र विषयात जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य मिळेल.एकूण गुण आणि जीवशास्त्र विषयातील गुण एकच असतील, तर रसायनशास्त्र विषयात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्यसीईटीतील सर्व गुण सारखे असल्यास दहावी किंवा बारावीमधील एकूण गुण जास्त असणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्यदहावी किंवा बारावीतील गुणही सारखे असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या विद्यार्थ्यास प्राधान्य