शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश; २५ लाखांची लूट

By admin | Updated: August 23, 2015 00:04 IST

लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना

अहमदनगर : लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना लुबाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी ४ जणांच्या टोळीविरुद्ध लोणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांचे नाव वापरुन फसविणारे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद येथील एम. विजय भास्कर रेड्डी यांनी ‘लोकमत’कडे त्यांची कैफियत मांडली. प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची २५ लाखांना फसवणूक झाली आहे. १७ आॅगस्टला त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.मुलीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गडबडीत असताना २९ जुलैला रेड्डी यांना एक एसएमएस आला होता. सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील मोजक्या जागा शिल्लक आहेत, असे त्यात म्हटले होते. रेड्डी यांनी ३० जुलैला संबंधित मोबाईलवर संपर्क साधला. दोन दिवसांनी सौरभ नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले. सौैरभने त्यांना प्रवरा मेडिकल महाविद्यालयात बोलाविले. ८ जुलैला सौरभने शैक्षणिक शुल्कापोटी रेड्डी यांना ५ लाख ४५ हजारांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यास सांगितले. सोबतच व्यवस्थापनाला २५ लाख रोख द्यावे लागतील, असा निरोप दिला. रेड्डी पुन्हा लोणी येथे आल्यानंतर सौरभने त्यांची आर. व्ही. पाटील यांच्याशी भेट घालून दिली व ते प्रवरा ट्रस्टचे सचिव असल्याचा दावा केला. १४ आॅगस्टला पाटीलने रेड्डी यांना वैद्यकीय प्रवेशपत्र सोपविले आणि त्यांच्याकडून रोख २५ लाख रुपये घेतले. मात्र १७ आॅगस्टला रेड्डी यांनी महाविद्यालयात प्रवेशाचे पत्र दाखविल्यानंतर ते बनावट असल्याचे उघड झाले. रेड्डी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)माझी कैफियत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली आहे. स्थानिक पोलिसांना आरोपींची सीसीटीव्हीतील छायाचित्रे, मोबाईल क्रमांक दिले आहेत. मात्र मोबाईल बंद झाले आहेत.- एम. विजय भास्कर रेड्डी,तक्रारदार, हैदराबादरेड्डी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांनी हैदराबादला गुन्हा दाखल करु, असे सांगितले होते. - विनोद पाटील,सहा. पोलीस निरीक्षक, लोणीरेड्डी मला भेटले होते. त्यांची फसवणूक झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती त्यांनी घेतली असती तर हे टळले असते. महाविद्यालय व्यवस्थापनाचा आरोपींशी संबंध नाही. - प्राचार्य डी. एस. कुलकर्णी, प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय, लोणी