शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रसारमाध्यमे गुंतली प्रतिष्ठेत’

By admin | Updated: January 17, 2016 00:50 IST

सध्या प्रसारमाध्यमे प्रतिष्ठेत गुंतली गेली आहेत. स्त्रियांची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य अजून माध्यमांनी केलं नाही, असे विधान परिसंवादात सहभागी राही भिडे यांनी ‘माध्यमातील

- सुवर्णा नवले,  पिंपरीसध्या प्रसारमाध्यमे प्रतिष्ठेत गुंतली गेली आहेत. स्त्रियांची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य अजून माध्यमांनी केलं नाही, असे विधान परिसंवादात सहभागी राही भिडे यांनी ‘माध्यमातील स्त्री प्रतिमा आणि भारतीय संस्कृती’ या दरम्यान केले. परिसंवादात भिडे, सरिता कौशिक, जयू भाटकर, गुरय्या रेवणसिद्धया स्वामी, अनिल देवपूरकर, डॉ. अनिरुद्ध मोरे, अमृता मोरे सहभागी झाले होते.परिसंवादात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्यामध्ये प्रसारमाध्यमांमधील स्त्रियांची प्रतिमा, दृकश्राव्य माध्यमातील जाहिरातबाजी, महिलांभोवती टीव्ही चॅनेलचा विळखा, प्रसारमाध्यमांमध्ये होणारा महिला- पुरुषांमधील भेदभाव, प्रसारमाध्यमांमधील मनोरंजन, शनी मंदिरात महिलेला केलेला मज्जाव अशा विविध विषयांवर परिसंवादात चर्चा घडून आली. तसेच, माध्यमांमध्ये स्त्रियांना हुशार, तेजस्वी राहावं लागणार आहे. खऱ्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू जोडलेले असतात. माध्यमे ही मनोरंजनाची साधने नाहीत. म्हणूनच मनोरंजनाशी संलग्न असलेल्या स्त्रीप्रतिमा संस्कृतीशी अनुरूप आहेत का, हे विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांशिवाय प्रत्येक माध्यम अपुरे आहे. मात्र, स्त्रियांची प्रतिमा मलीन करण्याचा हक्क माध्यमांना नाही. स्त्रियांना प्रसारमाध्यमांमध्ये हवे तेवढे स्थान अद्यापपर्यंत भेटलेले नाही. यामुळेच प्रसारमाध्यमांमध्येही ती निर्णयप्रक्रियेमागे राहिली आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व मोठं आहे. पण, तिची मोठी प्रतिमा दाखविण्याची उंची समाजात नाही. स्त्रीची पारंपरिक चौकट मोडण्याचं धैर्य माध्यमांनी केलं नाही.