शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मी, आर आर...

By admin | Updated: February 17, 2015 02:09 IST

नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे.

नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे. १६ आॅगस्ट १९५७ रोजी म्सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म. अंजनी हे जन्मगाव. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी श्रमदान करुन शिकलो. सांगलीच्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले. राजकीय जीवनामध्ये मी १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य, नंतर १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये मी विधानसभेवर निवडून आलो. ग्रामविकासमंत्री म्हणून जे ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियान’ मी राबवलं, त्यामुळे पवारसाहेब आणि जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं. मी ब्लॉगच्या निमित्ताने जे तुम्हाला सांगतो, ते सांगताना सुद्धा फार संकोच वाटतो. गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी पवारसाहेबांनी दिली. हे काम निष्ठेने व पवारसाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात किती यश आले हे जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.माझ्या आयुष्यावर यशवंतराव चव्हाण, महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरुन भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी जनतेत पोलिसांमार्फत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी, क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात फार यश आले अथवा नाही, याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील. मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्यासोबत बसून गप्पा मारायला आवडतात. त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे, असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. सत्ता, पैसे येतात आणि जातात. पण जोडलेली माणसे आणि जिवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते.