शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम् कंपनीत १४ वर्षांपासून एमडीचा कारभार

By admin | Updated: May 28, 2017 02:00 IST

पुण्याच्या सुजलाम् कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून एमडीचा कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, सुरुवातीला एमडीचा समावेश

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुण्याच्या सुजलाम् कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून एमडीचा कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, सुरुवातीला एमडीचा समावेश अमलीपदार्थांमध्ये करण्यात आला नसल्याने, सुजलाम् कंपनीचा कारभार नित्यनेमाने सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, महिनाभरापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) या कंपनीची पडताळणी झाली होती. त्यामध्ये कुठलाच गैरप्रकार आढळून आला नसल्याने, कंपनीला ग्रीन सिग्नल देण्यात आला. अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मानखुर्द जकात नाक्यावर पुण्यातील तस्कर हरिश्चंद्र नानासाहेब डोरजे (५२) याला बेड्या ठोकून, कोट्यवधींचा एमडी जप्त करत कंपनीला टाळे ठोकले. धक्कादायक म्हणजे, एफडीएने कंपनीची वेळोवेळी तपासणी केली. एप्रिल महिन्यातही तिची शेवटची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातही त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुळात एमडीचा औषधांत समावेश होत नाही, त्यामुळे त्याचा तपशील नसल्याचेही कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे एवढ्या वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या या अमलीपदार्थांच्या कारभाराला नेमके जबाबदार कोण, असा सवाल आता जनतेमधून उपस्थित केला जात आहे.