ठाणे : मेफेड्रॉन (एमडी) पावडरची विक्री करणाऱ्या ६ जणांना एका दक्ष नागरिकाच्या मदतीने राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एमडीच्या ४ पुड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.सलमान शेख (२२), गौरव शिंदे (१७), करण भोईर (१९), पवन अहिरे (१९), इरफान खान (१९) आणि महंमद पली शेख (२१) अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. एमडी पावडरची विक्री होत असल्याची माहिती एका गॅरेजचालकाने राबोडी पोलिसांना दिली. त्याच माहितीच्या आधारे २३ जानेवारी रोजी रात्री ११.३० वा.च्या सुमारास या टोळक्याची धरपकड करण्यात आली. (प्रतिनिधी)
एमडी पावडर विकणारे अटकेत
By admin | Updated: January 26, 2015 04:29 IST