शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’ त प्रवेशाची मंदी

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व

‘कॅप’मध्ये विद्यार्थ्यांचा निरुत्साह : विभागातील केवळ ४५ टक्के जागा भरल्यानागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये केवळ ४५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रचंड निरुत्साह व महाविद्यालयांचा घसरता दर्जा यांचा फटका प्रवेशप्रक्रियेला बसला. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली असल्याचे या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. याअंतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले प्रवेश होतील अशी महाविद्यालयांना अपेक्षा होती. परंतु ती सपशेल फोल ठरली. शेवटच्या फेरीनंतर नागपूर विभागात जवळपास ‘कॅप’ अंतर्गत येणाऱ्या ५५ टक्के जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे निरनिराळ््या ५२ महाविद्यालयांतील ‘कॅप’अंतर्गत येणाऱ्या एकूण ४,०४७ जागांपैकी केवळ १,८२६ जागांवरच प्रवेश झाले. तीनही फेऱ्यांअखेरच चक्क २,२२१ जागा रिक्त राहिल्याने या रिकाम्या जागांचे करायचे तरी काय असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.(प्रतिनिधी)महाविद्यालयांसमोर आव्हान‘कॅप’ अंतर्गत २,२२१ जागा रिक्त राहिल्या असून इतर कोट्यातील जागांना भरण्याचेदेखील आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यात संस्थास्तर, अल्पसंख्यक संस्था यांचादेखील समावेश आहे. नागपूर विभागात या सर्व मिळून एकूण ४,६०८ जागा उपलब्ध आहेत. यापैकी २,७८२ म्हणजेच सुमारे ६० टक्के जागा रिक्त आहेत.विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साहएमबीएला प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. हव्या त्या प्रमाणात नोकरी मिळत नसणे हे याचे सगळ््यात मोठे कारण आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविल्या जातात. मात्र त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. अनेक महाविद्यालयांत तर योग्य प्राध्यापक व सोयीसुविधा देखील नाहीत. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली.