शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गाला अखेर मुहूर्त!

By admin | Updated: April 20, 2015 02:38 IST

वर्षभरापासून निधीअभावी रखडलेल्या रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गाच्या कामाला मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला तीन कोटींचा भरणा

भार्इंदर : वर्षभरापासून निधीअभावी रखडलेल्या रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गाच्या कामाला मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला तीन कोटींचा भरणा केल्यानंतर गती मिळाली. पालिकेकडून ७ कोटी रुपये अदा न झाल्याने मे महिन्यापासून पश्चिम रेल्वेने या भुयारी मार्गाचे काम बंद केले होते. शहरातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी २० नोव्हेंबर २००९ च्या महासभेत भुयारी वाहतूक मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, रेल्वेने प्रकल्पाचे काम सुरू करण्यास वर्षभरानंतर मंजुरी दिल्याने प्रकल्पाची सुरुवात विलंबाने झाली. शिवाय, रेल्वेच्या जागेचा वापर केल्यापोटी रेल्वेने पालिकेकडे ७ कोटींच्या लेव्हिएबल चार्जेसची मागणी केली. ही थकीत रक्कम पालिकेने न भरल्यामुळे रेल्वेने प्रकल्पाचे काम मे २०१४ पासून बंद पाडले. गेल्या ८ महिन्यांपासून बंद पडलेले काम सुरू करण्याच्या उद्देशाने पालिकेने जानेवारी २०१५ मध्ये रेल्वेकडे ३ कोटींचा भरणा केल्याने प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात असून यंदाच्या अंदाजपत्रकात २० कोटींची तरतूददेखील केली आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, भुयारी मार्गासाठी केलेल्या तरतुदीनुसार निधी उपलब्ध झाल्यास रेल्वेच्या थकीत ४ कोटींचा भरणा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प येत्या वर्षात पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)