शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेअखेरीस लागणार बारावीचा निकाल

By admin | Updated: May 13, 2017 02:27 IST

गेल्या काही दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असलेली प्रतीक्षा आता संपत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असलेली प्रतीक्षा आता संपत आहे. मे महिन्याच्या अखेरीस या परीक्षांचा निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीे. बारावीच्या २० लाख ९ हजार उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून, नियमकांकडून त्या जमा करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत अधिकृतपणे तारीख जाहीर केली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर करण्यास जून उजाडल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आराखड्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, तसेच शिैक्षणिक संस्थांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने निकाल प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, बहिष्कार मागे घेतल्यानंतर, प्राध्यापकांनी पेपर तपासणीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे यंदा हा निकाल वेळेआधीच, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकालही वेळेवर-प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीचे काम संपवल्यानंतर, मॉडरेटरमार्फत ते बोर्डाकडेही जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे अगदी मेच्या शेवटच्या आठवड्यातही हा निकाल लागण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. दहावीचा निकालही वेळेतच लागणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले.