शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या अधिष्ठाता गजभिये यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

By admin | Updated: January 19, 2017 20:33 IST

औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहणे) यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यावर निर्णय होऊ शकला नाही.
टिमकी गोळीबार चौक येथील औषध पुरवठादार आशिष मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे मालक यांनी मेयो इस्पितळाला केलेल्या औषध पुरवठ्याच्या २ लाख ९४ हजार ६६० रुपयांच्या देयकाच्या मंजुरीसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. १६ जानेवारी रोजी ही लाच डॉ. गजभिये यांनी वसतिगृहातील खानावळ चालविणारा विजय मिश्रा याच्यावतीने मागितल्याचा आरोप करून सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणात एसीबीच्या अधिकाºयांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. सापळ्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत रात्र झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक न करता १७ जानेवारी रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजर होण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते.
मंगळवारी डॉ. गजभिये यांनी नेहमीनुसार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयाचा दौरा केला.‘डीएमईआर’ला झालेल्या प्रकाराची लेखी माहिती लिहिली. परंतु गजभिये यांंनी एसीबी कार्यालयात हजर होण्याचे टाळून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गजभिये यांना अटक करण्यासाठी एसीबीची वेगवेगळी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. बुधवारी त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसीबीच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना रीतसर अटक करण्यात आली. गुरुवारी डॉ. गजभिये यांना एक दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडवर पाठविण्यात आले. यादरम्यान रुग्णालयाची जबाबदारी डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. याला गंभीरतेने घेत डीएमईआरने दुपारीच डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. 
घरात पाच लाख वेतन
डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती शासकीय सेवेतृन निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्ती वेतन म्हणून ८० हजार रुपये मिळतात. निवृत्तीनंतर ते नाशिक येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देत आहेत. तिथे त्यांना दोन लाख रुपये मानधन मिळते, तर डॉ. मीनाक्षी गजभिये यांना अधिष्ठाता म्हणून २ लाख १० हजार रुपये वेतन मिळते. साधारण पाच लाख रुपये घरी वेतन येते. असे असताना डॉ. गजभिये यांनी केलेली १५ हजाराच्या लाचेच्या मागणीला घेऊन उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.
अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे कार्यभार
डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर मेयोचा कारभार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दिला जाणार होता, परंतु डॉ. निसवाडे यांनी नकार दिल्यानंतर रुग्णालयातील वयोज्येष्ठतानुसार पॅथालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. 
निलंबनाचा प्रस्ताव पाठविला
मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या निर्णयानंतरच कारवाई होईल.
-डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग