शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचे स्टिंग आॅपरेशन

By admin | Updated: March 31, 2015 04:07 IST

तेच आता मी फायनल करतेय, म्हणून म्हटले परत एकदा विचारावं, काय करायचं. मी विचार केला सगळ्यांना खूश करायचे. कारण कितीही विचार केला

बीएमसीमधून संदीप देशपांडे यांना फोन येतो... आॅपरेटर म्हणते, महापौर बोलणार आहेत.स्नेहल आंबेकर : हॅलो, जय महाराष्ट्रसंदीप देशपांडे : जय महाराष्ट्र मॅडम, बोला !स्नेहल आंबेकर : तेच आता मी फायनल करतेय, म्हणून म्हटले परत एकदा विचारावं, काय करायचं. मी विचार केला सगळ्यांना खूश करायचे. कारण कितीही विचार केला, तरी ते शेवटी बाकीकडून येणारच. आता तुमच्याकडे इंडिविज्युअलसुद्धा येऊन गेलेले आहेत. मी तुला दोन बोलले होते ना; याआधी. मग आता फायनल तीन देते.संदीप देशपांडे : नको मॅडम. तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही.स्नेहल आंबेकर : बाकीचे तुझ्या भरोसे राहिलेत ना. त्यांचे सगळ्यांचे लेटर आलेत.संदीप देशपांडे : तुम्हाला वाटेल तसं करा तुम्ही.स्नेहल आंबेकर : नाही ना, पण ऐकना, मी काय म्हणते, की इतर लोकांचे पण लेटर्स आलेत, सगळ््यांचे, पण ते फक्त तुझ्या शब्दाखातीर बोलले नसतील माझ्याशी.संदीप देशपांडे : आता तुम्ही मामाचं आॅलरेडी केलंय ना !स्नेहल आंबेकर : मामांचं पण आहे. नंतर वैष्णवी सरफरे आहे. तिचपण मला वाटतं आलंय. कॉन्ट्रॅक्ट आलय. तिच लेटरपण आहे, म्हणजे आणि मामांचं. तर मग कसं काय? काय करू मग?संदीप देशपांडे : अजून कोणाचे आलेत लेटर तुम्हाला डायरेक्ट?स्नेहल आंबेकर : लेटर...आता त्यांच्यावर कारवाईचं म्हटलं की टेन्शन येत बाबा...(हसून)संदीप देशपांडे : मी करतो ना कारवाई. (महापौर खळखळून हसतात..) लेटर तर सगळ्यांनीच दिलेत ना मॅडम!स्नेहल आंबेकर : हो तसंच झालंय...लेटर तर सगळ्यांनीच दिलेत...स्नेहल आंबेकर : मी काय करू मग आता...संदीप देशपांडे : मी मॅडम तुम्हाला दोन मिनिटांत फोन...स्नेहल आंबेकर : चालेल, चालेल...संदीप देशपांडे बीएमसीत फोन करतात...संदीप देशपांडे : हॅलो, हॅलो, संदीप देशपांडे बोलतोय. मॅडम आहेत का?स्नेहल आंबेकर : हॅलो बोला..संदीप देशपांडे : मॅडम, तुम्ही मामांना ३ आणि हिला ६ दिले ना वैष्णवीला.स्नेहल आंबेकर : नाही ६ नाही दिले, एक मिनिट हं जरा.महापौर केबिनमधील इतरांशी याबाबतचर्चा करतात...स्नेहल आंबेकर : हॅलो..संदीप देशपांडे : हा मॅडम..स्नेहल आंबेकर : सरफरे २ वाटत.संदीप देशपांडे : २ आहेत काय? मग माझं म्हणण होत की, मला वाटलेलं की ६ दिलेलं..पेपरमध्ये मी ६ वाचलेलं. मला वाटलं की ६ दिलं.स्नेहल आंबेकर : नाय, नाय. पेपरमध्ये ते चुकीचं होतं. ते पेपरवाले काय ना? (महापौर खळखळून हसतात...) मामांना ते ५-६..ते सगळं चुकीचं होतं...(महापौर पुन्हा हसतात...) ते सगळं चुकीचं आहे...त्याच्याबद्दल मी देते पण आहे लेटर...नोटीफिकेशनच्या आधी तुम्ही कसं काय डिक्लेअर करता चुकीचं. आता मी लेटर लिहिलंय संपादकांना...खुलासा करण्यात यावा. कशी माहिती घेतली ते?संदीप देशपांडे : वैष्णवीला ३, मामांना ५ दिलेत का? आम्हाला ५ द्या. १० करा...स्नेहल आंबेकर : नाही हो. पाच होत नाही ना! संदीप देशपांडे : मॅडम, तुम्ही आता समाजवादीला किती दिलेत. समाजवादीचे किती, ९ नगरसेवक आहेत. माझे २८ आहेत, मॅडम.स्नेहल आंबेकर : नाही नाही...तरी पण. त्या दिवशीच बोलत होती ना. त्यानंतर एवढ्या घडामोडी झाल्यात..प्रोजेक्टसाठी पण त्यांनी मागितलं ना माझ्याकडे...ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. परत देशमुख साहेब पण काही तरी म्हणताहेत...असं झालंय त्यात. चारचं करते ना...पुढे-मागे आहे ना. आपण करू या. आता ठेवूया ४ हं...संदीप देशपांडे : ५ करा मॅडम. जाऊंद्या आता ५ करा...स्नेहल आंबेकर : काय हो. एवढे कुठे !संदीप देशपांडे : एवढे नाही मॅडम. ५ करा तुम्ही.स्नेहल आंबेकर: आपल्याला रिलेशन चांगले ठेवायचे म्हणून, मी स्वत: पुढाकार घेऊन करतेय.संदीप देशपांडे : मी कुठे नाय म्हटलं. ५ करा, पण जे कराल ते सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. मामाला जास्ती येईल किंवा असं काही करू नका...स्नेहल आंबेकर : नाय, नाय तो वेगळा इश्यू आहे ना...संदीप देशपांडे : नाय, तस नका करू मॅडम..नाही तर ते माझ्या अंगावर येईल सगळं. मला घेवूच नका. मग, तुम्ही केलंय ते करून ठेवा.स्नेहल आंबेकर : नाय, नाय. पण त्यांना द्यायचे ना पण मग...संदीप देशपांडे : त्यांना काय वाटेल की, मग प्रत्येक जण...मग आमच्या पक्षात प्रॉब्लेम येणार.स्नेहल आंबेकर : आता बाकीच्या सगळ्यांनी तसंच केलंय...संदीप देशपांडे : सगळ्यांची गोष्ट वेगळी पडते ना मॅडम, आणि आमची वेगळी पडते. नको मग. तुम्ही एक काम करा. तुम्ही त्यांना जो टाकलाय तो टाकून द्या....मला नको काही...स्नेहल आंबेकर : पण मग बाकीच्यांचं नुकसान होईल ना.संदीप देशपांडे : होऊ द्या. मी साहेबांना सांगेन काय ते.स्नेहल आंबेकर : बरं, ठीक आहे...