शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी साकारली कचऱ्यावर बाग

By admin | Updated: June 6, 2017 01:27 IST

कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या कचराप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते; मात्र लोकप्रतिनिधी स्वत:च त्याचे अनुकरण करीत नाहीत, असा नागरिकांमध्ये समज असतो. या गैरसमजाला महापौर मुक्ता टिळक यांनी फाटा दिला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन ते साडेतीन टन कचरा जिरवून त्यांनी घराच्या छतावर सुंदरशी बाग तयार केली आहे.शहरातील कचराप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणे हेसुद्धा पर्यावरणाचेच रक्षण आहे, या भावनेमधून टिळक यांनी घरामध्येच ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प केल्यास, करामध्ये पाच टक्के सूट देण्यासही सुरुवात करण्यात आली होती. ओला कचरा जागच्या जागी जिरवण्यासंदर्भात पालिका; तसेच स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृतीवर भर देण्यात आला होता. ओला कचरा जिरवला गेला, तर समस्या सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. लोकप्रतिनिधी लोकांना कचरा जिरवण्याचे आवाहन करतात; परंतु स्वत: त्याचे अनुकरण करीत नाहीत. टिळक यांनी मात्र घराच्या छतावर विटांचे बांधकाम असलेले दहा पिट्स तयार केले आहेत. या पिट्समध्ये ओला कचरा टाकून त्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केले जाते. या पिट्समध्ये त्यांनी झाडे लावली आहेत. यासोबतच छोट्या कुंड्यांमध्येही त्यांनी झाडे लावलेली आहेत. २ वर्षांपासून त्यांनी ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. आजवर या पिट्समध्ये जवळपास तीन ते साडेतीन टन ओला कचरा जिरवला गेल्याचे टिळक यांनी सांगितले.>कचरा जिरवण्यासाठी पिट्सया बागेमध्ये जवळपास २०० झाडे आहेत. यामध्ये गुलाब, पांढरा चाफा, मोगरा अशी फुलझाडे आहेत. डाळिंब, पपईची झाडे आहेत. कारल्याचा वेलही या बागेमध्ये आहे. घराच्या आवारात असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या छतावरही त्यांनी ओला कचरा जिरवण्यासाठी पिट्स तयार केलेली आहेत. त्याठिकाणीही झाडे लावणार असल्याचे टिळक यांनी सांगितले. दैनंदिन वापरातील भाज्यांचे देठं, शिळे अन्न, भाज्या कापल्यानंतर शिल्लक राहिलेला भाग या पिट्समध्ये टाकला जातो. महापौर स्वत: या बागेमध्ये अजूनही लक्ष देतात. घरातील देव्हाऱ्यात याच बागेतील फुले जातात. ओल्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या या प्रयत्नांचे सर्वांनीच अनुकरण करायला हवे. पुणे महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून घराच्या छतावर ओला कचरा जिरवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास तीन ते साडेतीन टन कचरा जिरवला आहे. बागेमध्ये लावलेली सर्व झाडे छान आली आहेत. मी स्वत: बागेमध्ये लक्ष घालून ती जपली आहे. महापौर झाल्यापासून खूप वेळ देता येत नाही, परंतु शक्य होईल तेवढे बागेकडे लक्ष देते. नागरिकांनीही ओला कचरा आपल्या सोसायटीमध्ये, घराच्या छतावर जिरवल्यास कचराप्रश्न सुटण्यास त्याची मदतच होणार आहे. - मुक्ता टिळक, महापौर, पुणे