शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची बीआरटीवरून महापालिकेत पुरेवाट

By admin | Updated: May 20, 2016 01:40 IST

महापालिका सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी नगर रस्ता बीआरटी मार्गावरून आरोपप्रत्यारोपांचे वादळ उठले.

पुणे : महापालिका सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी नगर रस्ता बीआरटी मार्गावरून आरोपप्रत्यारोपांचे वादळ उठले. सत्ताधारी राष्ट्रवादीवर सेना, भाजपा, काँग्रेस यांचे सदस्य तुटून पडले. त्यांना उत्तर देताना महापौर प्रशांत जगताप यांची पुरेवाट झाली. अखेरीस या रस्त्यावर पादचारी सुरक्षेसाठी पूल किंवा अन्य कोणते उपाय करता येतील याचा प्रस्ताव प्रशासन सोमवारी (दि.२२) सर्वसाधारण सभेत सादर करेल, असे आश्वासन त्यांना सभागृहाला द्यावे लागले.नगर रस्ता बीआरटी सुरू झाल्यापासून तिथे अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. बुधवारी सर्वसाधारण सभेत काँग्रेस, सेना, भाजपा यांनी आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महापौर जगताप यांच्या आदेशावरून रात्री आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटीशी संबंधित सर्वांची संयुक्त बैठक घेतली. त्यात अनेक निर्णय झाले. गुरुवारी सकाळी या मार्गावर पुन्हा अपघात झाला. त्यामुळे दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची धार धरली.नगरसेवक योगेश मुळीक, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, संजय भोसले यांनी बीआरटी मार्गाचे संपूर्ण काम होत नाही तोपर्यंत हा मार्ग बंद करावा, अशी मागणी केली. वाहतूक पोलीस नाहीत, रस्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत, पादचाऱ्यांच्या सुरक्षेची कसलीच काळजी घेण्यात आलेली नाही. ही महत्त्वाची कामे अपूर्ण असताना मार्ग सुरू तरी कशाला केला, असा सवाल त्यांनी महापौरांना विचारला. अन्य नगरसेवकांनीही यावरून प्रशासनावर टीका केली. (प्रतिनिधी) >सोमवारच्या सभेत अहवालपादचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाचीच आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापौर जगताप म्हणाले. काही ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शास्त्रीनगर, रामवाडी, विमाननगर, चंदननगर, याचा त्यात समावेश आहे. प्रशासन याचा अभ्यास करीत असून, याबाबत सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अहवाल ठेवण्यात येईल, असे महापौरांनी सभागृहाला सांगितले. त्यानंतर सदस्य शांत होऊन पुढील विषयांना सुरुवात झाली.