शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी रामाणे, भालकर यांचे अर्ज दाखल

By admin | Updated: November 11, 2015 00:51 IST

‘ताराराणी’तर्फे स्मिता मानेंचा अर्ज : शमा मुल्ला, संतोष गायकवाड, राजसिंह शेळके यांचे उपमहापौरपदासाठी अर्ज; कॉँग्रेसकडूनही आता चमत्काराची भाषा

कोल्हापूर : येत्या सोमवारी होत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे अपेक्षेप्रमाणे अश्विनी अमर रामाणे, तर भाजपतर्फे सविता शशिकांत भालकर यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. ताराराणी आघाडीच्या स्मिता मारुती माने यांनी मात्र ऐनवेळी महापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. उपमहापौरपदासाठी शमा सलीम मुल्ला (राष्ट्रवादी), संतोष बाळासो गायकवाड (भाजप), तर राजसिंह भगवानराव शेळके (ताराराणी आघाडी) यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेली घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने महानगरपालिकेचा विठ्ठल रामजी शिंदे चौक दणाणून गेला. महापौरपदासाठी कॉँग्रेसने, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने अनुक्रमे अश्विनी रामाणे व शमा मुल्ला यांचे अर्ज दाखल केले असले तर, भाजप व ताराराणी आघाडीने मात्र महापौर व उपमहापौर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (पान १ वरून) राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली चर्चा सुरू असल्याने त्यांनी कदाचित भाजपचा महापौर नको अशी अट घालून ताराराणीला सहकार्य करायचे ठरविल्यास अडचण नको म्हणून ताराराणी आघाडीने दोन्ही पदांसाठी अर्ज भरले असल्याचे या आघाडीचे सुनील कदम यांनी पत्रकारांना सांगितले. महापौर-उपमहापौर या पदांसाठी येत्या सोमवारी (दि. १६) जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. दुपारी पावणेचार वाजता सर्वप्रथम भाजप व ताराराणी आघाडीचे उमेदवार चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव, ‘ताराराणी’चे सुनील कदम, सत्यजित कदम, संभाजी जाधव, ईश्वर परमार, विजय सूर्यवंशी, विलास वास्कर, नीलेश देसाई, प्रकाश नाईकनवरे होते. या सर्वांनी स्थायी समिती सभागृहात जाऊन तेथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप-ताराराणी उमेदवारांचे प्रत्येक एक अर्ज भाजपतर्फे सविता शशिकांत भालकर यांनी महापौरपदासाठी दाखल केलेल्या अर्जावर भाग्यश्री शेटके या सूचक असून, अजित ठाणेकर यांनी अनुमोदन दिले आहे; तर ‘ताराराणी’तर्फे अर्ज भरलेल्या स्मिता मारुती माने यांच्या अर्जावर अर्जना पागर या सूचक असून नीलेश देसाई यांनी अनुमोदन दिले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून संतोष बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जावर ललिता बारामते या सूचक असून विलास वास्कर यांनी अनुमोदन दिले आहे; तर ताराराणी आघाडीकडून राजसिंह भगवानराव शेळके यांच्या अर्जावर सीमा कदम या सूचक असून, राजाराम गायकवाड यांनी अनुमोदन दिले आहे. ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेपुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कॉँग्रेसच्या मजबुतीकरणासाठीचा प्रयत्न म्हणून अश्विनी रामाणे यांचे नाव महापौरपदासाठी कॉँग्रेस पक्षातर्फे निश्चित करण्यात आले असल्याची अचूक बातमी सोमवार (दि. ९) च्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची शहरात दिवसभर चर्चा होती. दुपारी चार वाजता कॉँग्रेस पक्षाने रामाणे यांच्या नावाची घोषणा करून ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरविले.