शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत महापौर निवड ८ मार्चला; प्रशासनाचा निर्णय

By admin | Updated: March 2, 2017 05:57 IST

अपक्षांना गळाला लावून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या शिवसेनेला पालिका प्रशासनाने आज झटका दिला.

मुंबई: अपक्षांना गळाला लावून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या शिवसेनेला पालिका प्रशासनाने आज झटका दिला. महापौरपदाच्या निवडणुकीच्या तारखेवरून सुरू असलेला घोळ मिटवण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार पालिका मुख्यालयात अवतरले. मात्र भाजपने त्यापूर्वीच आयुक्त अजय मेहता यांना गाठून महापौर निवडणुकीसाठी ८ मार्च या तारखेवर शिक्कामोर्तब करून घेतले. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि गूढ आणखी वाढले आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपातील सामना बरोबरीत सुटला. मात्र सत्तेचे गणित जुळवण्यासाठी अद्याप उभय पक्षांना ‘मॅजिक फिगर’ गाठता आलेली नाही. त्यामुळे सेना-भाजपा युतीची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपाच्या नरमाईमुळे असे संकेत मिळत आहेत. मात्र तरीही शिवसेनेने चार अपक्षांना आपल्याकडे वळवून महापौरपदाच्या दिशेने कूच केली आहे. तथापि, आता ९ मार्चला होणारी ही निवडणूक ८ मार्चलाच दुपारी १२ वाजता घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ८ मार्च या तारखेवर शिक्कामोर्तब झाले. ही तारीख बदलण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, तृष्णा विश्वासराव ही नेतेमंडळी आज दुपारी मुंबई महापालिकेत धडकली. मात्र आयुक्तांचे मतपरिवर्तन त्यांना काही करता आले नाही. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय झाल्याचा आरोप सेनेने केला आहे. महापौरपद यंदा खुले असल्याने शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकच नव्हे, तर महिला नगरसेवकांनीही जोर लावला आहे.>... तर शिवसेनेला संधी काँग्रेसने आपला उमेदवार महापौरपदासाठी उभा केल्यास राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएम, मनसे असे विरोधी पक्षाचे नगरसेवक काँग्रेस उमेदवाराला मतदान करतील. त्यामुळे भाजपाला त्यांच्या ८२ नगरसेवकांचीच मते मिळतील. तर शिवसेनेला त्यांच्याकडे असलेल्या ८९ नगरसेवकांचा कौल मिळून त्यांचा महापौर निवडून येईल. तथापि, भाजपाने फोडाफोडी केल्यास शिवसेनेला फटका बसू शकतो.