शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीची माया

By admin | Updated: July 6, 2016 17:47 IST

सेवानिवृत्त अभिययंत्याकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महावितरण कंपनीच्या दोन्ही अभियंत्याकडे कोट्यवधीची माया असल्याचे उघड झाले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ : सेवानिवृत्त अभिययंत्याकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महावितरण कंपनीच्या दोन्ही अभियंत्याकडे कोट्यवधीची माया असल्याचे उघड झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी कार्यकारी अभियंता गणेश पाचपोहे यांच्या धुळे व कल्याण तर सहायक अभियंता राजेंद्र काबरा यांच्या जळगाव येथील घराची झडती घेतली. त्यात दोघांच्या घरातून मालमत्तेचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.

धरणगावला कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता पाचपोहे व राजेंद्र काबरा यांना मंगळवारी जळगाव येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. ८ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने बुधवारी दोघांच्या घराची झडती घेतली.पाचपोहे यांच्याकडे शेतीसह कल्याणला फ्लॅट

कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे हे कल्याण येथे राहतात. कल्याण येथील घराची झडती घेतली असता याठिकाणाहून ५६ लाखांचा वरटेक्स कल्याण येथील ८८० स्वे.फुटचा फ्लॅट, कल्याणमधील शिवकृपा सोसायटी नवीन मुरबाड येथील ३ लाख ६५ हजारांचा फ्लॅट, नवीन मुरबाड परिसरातील वृदांवन व्हॅली येथे १७ लाख ८२ हजाराचा फ्लॅट, याच ठिकाणी गाडी पार्किंगसाठी २० हजाराची जागा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे ५४ हजाराची बखळ जागा, रावेर येथे ८० हजारांचा बखळ प्लॉट, रावेर तालुक्यातील मुजलवाडी शिवारात २ हेक्टर ३० आर शेत जमिनीचा उतारा अशी कोटीच्या घरात मालमत्तेची कागदपत्रे मिळून आली.

साहाय्यक अभियंता लखपतीकार्यकारी अभियंता पाचपोहे याच्यासोबत लाचखोरीत सापडलेला साहाय्यक अभियंता राजेंद्र शंकरलाल काबरा याच्या शहरातील रिंगरोड परिसरातील जयनगरमधील व्यंकटेश अपार्टमेंट येथील घरझडतीमध्ये रोख रक्कमेसह विविध बँकांचे पासबुक, धनादेश हस्तगत करण्यात आले आहे. घरातील कपाटामध्ये २ लाख ८९ हजार २५० रुपए मिळून आले. फिक्स डीपॉझिटचे ४३ हजाराचे चार धनादेश मिळाले. स्टेट बँक आॅफ इंडियाचे तीन बचत खाते मिळून आले. तिघं खात्यांमध्ये एकूण २५ लाख ८ हजार रुपयांपर्यंत रक्कम आहे. तसेच पिपल्स को.आॅ.बँकेच्या लॉकरची चॉबी मिळून आली.