शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात आकाश नजाऱ्यांची मेजवानी; तीन ग्रहांचे दर्शन, दोन ग्रहांचा अस्त अन्...

By atul.jaiswal | Updated: May 2, 2024 13:13 IST

मेच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करेल.

अकोला : दिवसा प्रखरतेने तापणारा सूर्य मावळतीला गेल्यानंतर रात्रीच्या निरव शांततेत आकाश न्याहाळण्याची मजा काही औरच असते. मे महिन्यात निरभ्र आकाशात तीन ग्रहांचे दर्शन, दोन ग्रहाचा अस्त, उल्का वर्षाव, आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आदींची मेजवानी अवकाश प्रेमींसाठी सज्ज राहणार आहे.

मेच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा मेष राशीतुन वृषभ राशीत प्रवेश करेल. आजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्राचा अस्त ६मे ला पूर्वेस तर सर्वात मोठा असलेल्या गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल यालाच ग्रामीण भागात चांदणी बुडी असेही म्हटले जाते.

गुरुवार, ४ मे च्या पहाटे वलयांकित शनी ग्रह चंद्राचे वर तर, शुक्रवर ५ मे रोजी लालसर रंगाचा मंगळ ग्रह चंद्राचे अगदी जवळ आणि शनिवार, ६ मे रोजी सर्वात लहान असलेला बुध ग्रह चंद्रकोरी खाली पाहता येईल. एवढेच नव्हे तर ५ मे रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर कुंभ राशी समुहात दरताशी साठ विविध रंगांच्या उल्का रात्री दोन नंतर पडताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र दर्शनआपल्या पृथ्वीला सूमारे दीड तासात एक फेरी पूर्ण करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मंगळवार ९ मे रोजी रात्री ०७: ५७ ते ०८:०३या वेळी नैॠत्येकडून ईशान्य बाजूस जाताना फिरत्या चांदणी रूपात दिसेल. १० मे रोजी रात्री ०७:०८ ते ०७:१३ या वेळी दक्षिण पूर्व आकाशात, ११ मे रोजी पहाटे ०४:५७ ते ०५:०३ या वेळी वायव्य ते आग्नेय दिशेला तर १३ मे च्या पहाटे ०४:५४ ते ५ वाजता वायव्य ते दक्षिणेकडे जाताना दिसेल.

सावली सोडेल साथआपला सूर्य या मे महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर असेल. याची सुरुवात दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाईल. बरोबर माध्यान्याचे वेळी सूर्य नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही वेळा पूर्ती नाहीशी झाली असेल. अशी घटना केवळ मकरवृत्त ते कर्कवृत्त या भागात घडून येते. भारतात रांची, भोपाळ झाशी या पट्ट्याच्या दक्षिण भागाकडे ही अनुभूती घेता येईल.

आपल्या जीवनात आनंद भरण्यासाठी विविध छंद सहायक ठरतात. आकाश निरीक्षणाच्या छंदातून आगळावेगळा आनंद घेता येतो. मे महिन्यात आकाशात विविध नजाऱ्यांची मेजवानी मेजवानी असणार आहे. संध्याकाळी हवेतील गारवा आकाशातील विविध गमती-जमती दर्शनार्थ सहायक ठरतो.- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला