शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

30 मे रोजी देशातील सर्व मेडिकल राहणार बंद

By admin | Updated: May 27, 2017 12:04 IST

येत्या 30 मे रोजी देशातील सगळे मेडिकल बंद असणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27- येत्या 30 मे रोजी देशातील सगळे मेडिकल बंद असणार आहेत. औषधांच्या विक्रिवर सरकारकरून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी एक दिवसाचा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. पण असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना जास्त बसणार आहे. 29 मे रोजी रात्री 12 वाजता संपाला सुरूवात होणार आहे. 
 ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टच्या अंतर्गत एकुण नऊ लाख मेडिकल चालवले जातात. "अनेक वेळा आमच्या तक्रारी सरकारकडे मांडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे," असं ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचं म्हणणं आहे. मेडिकलच्या या राष्ट्रव्यापी संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे.  सरकार आपल्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं असल्याचा आरोप मेडिकल असोसिएशनने सरकारवर केला आहे. 30 मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनसुद्धा केली जाणार आहेत. 
गेल्या अनेक दिवसांपासून औषध विक्रेत्यांकडून त्यांना मिळत असलेलं कमिशन वाढवून मिळण्याची मागणी होते आहे. औषध विक्रेत्यांना सध्या विक्रिवर 16 टक्के कमिशन दिलं जातं आहे. या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते आहे. सरकार मेडिकलमधल्या सुविधा वाढवायला सांगतं आहे पण नव्या सुविधा देण्यासाठी खर्च जास्त होतो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं असल्याचं मेडिकल असोसिएशनकडून सांगितलं जातं आहे. 
इतकंच नाही, तर औषधांच्या होणाऱ्या ऑनलाइन विक्रिवरसुद्धा मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. औषध ऑनलाइन विकल्यामुळे मेडिकलचं उत्पन्न घटतं आहे तसंच औषधाचा दुरूपयोग होऊ शकतो आणि औषधांचे दुष्परिणार होण्याची शक्यता जास्त असल्याचं, असोसिएशचं म्हणणं आहे.