शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मावळात धुमसतंय राजकीय वैमनस्य

By admin | Updated: October 16, 2016 19:17 IST

गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृन खून झाला होता. ऐन निवडणुकीच्या

पिंपरी, दि. 16 - गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या खूनाच्या घटनेनंतर दीड वर्षात अशाच खूनाच्या घटना आणखी घटना घडल्या. महिनाभरापुर्वीच तळेगाव नगरपरिषदेचे नगरसदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खूनी हल्याचा कट फसला. शस्त्र घेऊन हल्याच्या तयारीत आलेले आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृन खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा या घटनांतून प्रत्यय आला आहे.

 
तळेगावात गुन्हेगारी टोळया सक्रिय असून त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपचांयत अथवा नगरपरिषदेची निवडणूक असते, त्यावेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातुन घडणाºया घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाºया आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणा-यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. 
 
२०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खूनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खूनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरांमध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यकतींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाºया गुंडाच्या टोळया या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळया स्वरुपाची असून गुन्हेगारीला एक प्रकारे राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातुन काटा काढण्यात आला. ग्रामपंचायत ते नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.