शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी - हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: April 16, 2015 14:59 IST

मावळ गोळीबारात संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - मावळ गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.  संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ गोळीबाराप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली असून गुरुवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते खंडेलवाल यांनी कोर्टासमोर बॅलेस्टिक अहवाल सादर केला. कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच झाला होता असे या बॅलेस्टिक अहवालातून समोर आले आहे. याशिवाय कांतीबाई ठाकर या उताराच्या दिशेने धावत गेल्या होत्या व त्यादिशेने संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता असा आरोप पोलिसांनी केला.  तपासात या अहवालाची दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने राज्य सरकारला गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करुन संदीप कर्णिक यांच्यावर योग्य कारवाई करा असे सुनावले आहे. 
९ ऑगस्ट २०११ रोजी मुंबई पुणे महामार्गावर भारतीय किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी आंदोलन केले होते. पवना धरणातील पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यास शेतक-यांचा विरोध होता. या आंदोलनाला शिवसेना, आरपीआय व भाजपा या पक्षांचाही पाठिंबा होता. आंदोलन करणा-या शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तिघा शेतक-यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कांताबाई ठाकर या महिलेचाही समावेश होता. संदीप कर्णिक हे त्यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते.