शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विषबाधेच्या दुर्घटनेमुळे मावळात डॉक्टरांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:25 IST

मुंबई येथे जंतनाशक गोळ्या मुलांना खायला दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या गोळ्यातून झालेल्या विषबाधेमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व कर्मचाऱ्यांची गोळ्या परत मागवण्यासाठी धडपड सुरु झाली.

ठळक मुद्देसर्वत्र जंतनाशक दिनाच्यानिमित्त १ ते १९ वयोगटातील मुला-मुलीना जंतनाशकच्या गोळ्या

कामशेत : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्यानिमित्त मुंबई येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यात काही मुलांना मुलांना विषबाधा झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १० ऑगस्ट ) घडली. मात्र, लोकमत ऑनलाईन न्यूजमध्ये नजरचुकीने कामशेतमध्ये विषबाधेमुळे एकाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आला होता. मात्र, तशी कुठलीही घटना त्या परिसरात घडलेली नाही. परंतु, मुंबई येथील घटनेमुळे मावळ परिसरात डॉक्टर वर्गात एकच धावपळ झाली. कारण जंतनाशक दिनानिमित्त आंदर मावळातील काही भागांमध्ये आरोग्य विभाग, मावळ गटविकास अधिकारी यांच्याकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. ज्या ज्या भागात या गोळ्या वाटण्यात आल्या त्या त्या संबंधीची माहिती तत्काळ माहिती घेण्यात आली. सर्वत्र जंतनाशक दिन शुक्रवार [ दि. १० ] रोजी साजरा करण्यात येतो. यामध्ये १ ते १९ वयोगटातील सर्व मुला मुलीना जंतनाशकच्या गोळ्या देण्यात येतात. मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, मराठी शाळा, शासकीय अनुदानित माध्यमिक विद्यालय, आश्रम शाळा, तसेच १ ते १९ वयोगटातील शाळाबाह्य मुलांना या दिवशी सर्व अंगणवाडी, शाळा, सरकारी दवाखाने आदी ठिकाणी दरवर्षी मुलांना गोळ्या खाऊ घालण्यात येतात. या राष्ट्रीय योजनेसाठी सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षा, आरोग्य कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका काम करतात. याविषयी महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी मुकुल वासनिक म्हणाले, आम्ही सर्वत्र भेट देत आहोत. एमओ आणि आशा वर्करला तपासणी करूनच गोळ्या द्या आणि काही अडचण आलीच तर एमओ किंवा पीएचओ यांना संपर्क करा अशी माहिती देण्यात आली आहे.

......................

आपल्या भागात जंतनाशक गोळ्या संबंधी काही अडचण अथवा कोणतीही काळजीवह घटना घडलेली नाही. तसेच मुलांविषयी आरोग्य विभागाविषयी सर्वच दृष्टीने काळजी घेत आले आहे . कारण या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर अनेक यंत्रणा प्रत्येक उपक्रमांची तत्परतेने याबाबत माहिती घेत आहेत-  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे 

टॅग्स :kamshetकामशेतtabletटॅबलेट