शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींची पालखी मल्हार नगरीत

By admin | Updated: July 14, 2015 23:54 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मल्हारी मातंर्डाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सायंकाळी

जेजुरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मल्हारी मातंर्डाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सायंकाळी प्रवेश केला. जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत केले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले. संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत माऊलींची नित्य महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याने सकाळी ७.३० वाजता जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. माऊली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे १०० डॉक्टरांच्या पथकासह आळंदी ते पंढरपूरपर्यंत सोहळ्याला मोफत आरोग्य सेवा व औषधोपचार पुरवण्यात येत आहेत. बुधवारी पहाटे सोहळा वाल्हे मुक्कामी प्रस्थान ठेवणार आहे. (प्रतिनिधी)आत्मिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा या हेतूने सहभागी झालो आहे़ कमीत कमी १५ दिवस तरी मनाला शांतता व समाधान वैष्णवाच्या सहवासात लाभेल, याची अनुभुती घेण्यासाठी सहभागी झालो. - दीपक भोसले, मालेगाव, जि़ धुळेपुण्यात चहाची हातगाडी असून या पायी वारीत सहभागी होऊन व्यसनापासून दूर राहता येईल का याचा अनुभव घेण्यासाठी पालखी सोहळ्यात पहिल्यादांच सहभागी झालो आहे़ - अविनाश जाधव, पुणेवारकऱ्यांनी निर्माण केला स्वच्छतेचा आदर्शवारकऱ्यांच्या माथी अस्वच्छतेबद्दल खापर फोडले जात असताना मंगळवारी सासवडच्या तळावर वारकऱ्यांनी स्वच्छतेचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी जेजुरीत दाखल झाली असून, बुधवारी वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.वारकरी स्वच्छता पाळत नाहीत, बेशिस्त वागतात असा त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. ते काही अंशी ते खरे असले तरी वारकऱ्यांना पर्याय उपलब्ध नसल्याने पालखी मार्गावर अस्वच्छता राहते. त्यावर उपाय म्हणून आळंदीच्या चोपदार फाउंडेशन व पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने वारकऱ्यांना ५० हजार पिशव्यांचे वाटप केले. कचरा, शिळे अन्न कुठेही न टाकता पिशवीत भरावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले होते.