शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

माउलींचा सोहळा फलटण नगरीत

By admin | Updated: July 8, 2016 01:33 IST

ध्यानी मनी विठ्ठलाची आस धरीत पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा लाखो वार महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला.

फलटण : ध्यानी मनी विठ्ठलाची आस धरीत पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा लाखो वार महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला. माउलींचा पालखी सोहळा शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरडकडे प्रस्थान करणार आहे.संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी बुधवारी तरडगाव येथे मुक्कामी होती. गुरुवारी पहाटे माउलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. कर्णेकऱ्याने तिसरा कर्णा वाजविला आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठलऽऽ’चा एकच जयघोष झाला. त्यानंतर पालखीने तरडगाव सोडले आणि भक्तीचा जागर करीत वैष्णवांचा महासागर पंढरीच्या रस्त्याने निघाला. माउलीला निरोप देण्यासाठी तरडगावकर गावाच्या वेशीपर्यंत आले होते. माउलींचा गजर करीत सोहळा काळजच्या दत्त मंदिरात विसावला. त्यावेळी ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुरवडी येथे विसावा घेऊन पालखी दुपारच्या नैवेद्यासाठी निंभोरे येथे थांबली. त्यानंतर सोहळा सायंकाळी पाचला फलटणच्या वेशीवर आला. (वार्ताहर)बेलवाडीत अश्वरिंगण सोहळा!बारामती : सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे विसावला. सकाळी ७पासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्वरिंगण सोहळ्याची सुरुवात शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावनधारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी विठूनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना सर्वच जण वयोभान विसरले होते. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्यादरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले.