शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माऊली सोपानकाकांच्या सासवड नगरीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 02:18 IST

विठ्ठलनामाचा गजर करीत, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत, दिवे घाटाची अवघड चढण चढून संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : विठ्ठलनामाचा गजर करीत, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत, दिवे घाटाची अवघड चढण चढून संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा संत सोपानकाकाच्या सासवड नगरीत विसावला. सासवड येथे मंगळवार, बुधवार असा दोन दिवस मुक्काम आहे. सासवड येथील भव्य पालखी तळावर रात्री ८ वाजता सोहळा दाखल झाला. तळावर वारकऱ्यांनी रिंगण केले होते. ज्ञानोबा-माऊलींचा गजर सुरू होता. चोपदारांनी दंड उंचवताच सर्वत्र शांतता झाली. हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली. या ठिकाणी ८.१५ वाजता समाज आरती झाली. गुरुवारी सकाळी निघायचे आहे, असे चोपदारांनी जाहीर केल्यावर माऊलींच्या नावाचा गजर झाला व वारकरी आपापल्या मुक्कामाचे ठिकाणी गेले. पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक आज माउलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. दुपारी पाच वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथे अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. रस्त्यात ठिकठिकाणी वारकाऱ्यांसाठी पाणी ,फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण ,विद्यार्थी वाहतूक व्यवस्था पाहत होते. सासवड येथे पालखी तळाजवळ नियंत्रण कक्ष उभारला आहे तेथे सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची सोय आहे , पाणी पुरवठ्याची सोय केलेली आहे . रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होती.दरम्यान, चंदन टेकडीनजीक पालखी रथाचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही क्षणानंतर पालखी मानकऱ्यांच्या खांद्यावर सासवडच्या पालखी तळावर आणण्यात आली. अनेक ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी पालखी स्वागतासाठी थांबविण्यात आल्याने पालखीला विलंब झाला.