शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

चटई पुरवठादाराचे गौडबंगाल

By admin | Updated: June 30, 2015 02:56 IST

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भवानी एंटरप्रायझेसला १२,७०२ प्लॅस्टिक चटया पुरवठा करण्याचा १ कोटी ८० लाख रुपयांचा कार्यादेश महिला व बाल कल्याण विभागाने दिला आहे.

- सोपान पांढरीपांडे /विजय चोरडिया , नागपूर/ जिंतूरपरभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भवानी एंटरप्रायझेसला १२,७०२ प्लॅस्टिक चटया पुरवठा करण्याचा १ कोटी ८० लाख रुपयांचा कार्यादेश महिला व बाल कल्याण विभागाने दिला आहे. पण ‘लोकमत’च्या चौकशीत या फर्मबद्दल अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत.शासनाच्या आदेशात भवानी एंटरप्रायझेसचा पत्ता प्लॉट नं. ए-१२, एमआयडीसी, जिंतूर असा दिला आहे. या ठिकाणी लोकमतच्या जिंतूर प्रतिनिधीने भेट दिली असता तिथे शाळांना लागणारे बेंचेस बनविण्याचा कारखाना बंद स्थितीत असल्याचे दिसून आले. या कारखान्याची शेड नुकतीच बांधली असून, तिथे प्लॅस्टिक चटया विणण्यासाठी लागणारे लूम्स (माग) नाहीत किंवा कच्चा माल म्हणजे पॉलीप्रॉपिलीनच्या धाग्यांचा साठाही आढळून आला नाही. मालक कोण?उद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल स्टोअर्स व प्रोक्युरमेंट आॅफिसने भवानी एंटरप्रायझेसशी जो दरकरार केला आहे त्यावर भवानी एंटरप्रायझेसचे दोन मोबाइल नंबर दिले आहेत. यापैकी एक फोन गजानन इटोलेकर यांचा आहे; तर दुसरा सुभाष पाखरे यांचा आहे, असे ट्रु कॉलर अ‍ॅपवरून समजले. यापैकी पाखरे यांच्या फोनवर प्रतिसाद मिळाला नाही; पण इटोलेकर यांना फोन केला असता पलीकडील इसमाने लोकमत प्रतिनिधीने आपले नाव सांगताच राँग नंबर म्हणून मोबाइल बंद केला. शनिवारी व रविवारी अनेक वेळा हा प्रकार झाला. जिंतुरात अधिक चौकशी केली असता भवानी फर्म्सचे मालक इटोलेकर असल्याचे कळले व पाखरे त्यांचे घनिष्ठ मित्र असल्याचे समजते. इटोलेकर व पाखरे हे दोघेही स्व. प्रमोद महाजन यांच्या कुटुंबाचे निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली. वॉटर फिल्टरप्रमाणे याही प्रकरणात चटयांचे टेंडर ७ फेब्रुवारीला निघाले व रेट कॉन्ट्रॅक्ट ११ फेब्रुवारीला मंजूर झाले व त्याच दिवशी १२,७०२ चटया घेण्याचा प्रस्ताव तयार झाला व १३ फेब्रुवारीला शासन आदेश निघाला.भवानी एंटरप्रायझेसच्या मालकांनी फोनवर बोलण्यास नकार दिल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. भवानी एंटरप्रायझेसचा पत्ता प्लॉट नं. ए-१२, एमआयडीसी, जिंतूर या पत्त्यावर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने भेट दिली. या पत्त्यावर नुकताच उभारलेला कारखाना दिसून आला. या ठिकाणी एकही बेंच दिसले नाही.भवानी एंटरप्रायझेसच्या मालकांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. या फर्मचा नेमका मालक कोण व इटोलेकर, पाखरे यांचे फोन नंबर सरकारी कागदपत्रात का आले त्याचा भवानी एंटरप्रायझेसशी काय संबंध आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.भवानी एंटरप्रायझेस या कारखान्याची शेड नुकतीच बांधली असून, तिथे प्लॅस्टिक चटया विणण्यासाठी लागणारे लूम्स (माग) नाहीत किंवा कच्चा माल म्हणजे पॉलीप्रॉपिलीनच्या धाग्यांचा साठाही आढळून आला नाही.