शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’ची दानपेटी गुरुदक्षिणेच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: July 10, 2017 06:00 IST

गुरूपौर्णिमनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दरवर्षी ‘मातोश्री’वर उसळणारी गर्दी आता ओसरली

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुरूपौर्णिमनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दरवर्षी ‘मातोश्री’वर उसळणारी गर्दी आता ओसरली असून काही मोजके शिवसैनिक वगळता मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, दानपेटी रितीच राहिली.बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु-शिष्याचे नाते होते. त्यामुळे दरवर्षी गुरूपौर्णिमेनिमित्त वांद्रे येथील ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर सामान्य शिवसैनिकांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांची तोबा गर्दी उसळत असे. मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर हजेरी लावत. बाळासाहेबांचा हात आपल्या डोक्यावर यावा, यासाठी रेटारेटीही होत असे.>मोजकेच शिवसैनिक आले मातोश्रीबाहेर गर्दी होण्याचे हे चित्र इतिहासजमा झाल्याचे आज पाहायला मिळाले. राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही सेनेच्या मंत्र्यांसह, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी ‘मातोश्री’कडे चक्क पाठ फिरवली. काही मोजके शिवसैनिक हातात पुष्पगुच्छ घेऊन आल्याचे दिसले.गुरु पौर्णिमेला ‘मातोश्री’बाहेर एक पेटी ठेवली जाते. गुरु दक्षिणा म्हणून त्या पेटीत शिवसैनिक पैसे टाकतात. ते पैसे पक्षकार्यासाठी वापरले जातात. यंदा ही पेटी गुरूदक्षिणेनं ओसंडून वाहिल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिष्यांनीच पाठ फिरवल्याने दानपेटीही ‘दक्षिणे’च्या प्रतिक्षेतच राहिली.