शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरमध्ये साकारतेय ‘मातोश्री-२’

By admin | Updated: March 29, 2017 03:45 IST

शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे सत्ता केंद्र ठरलेल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आता नवीन

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे सत्ता केंद्र ठरलेल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आता नवीन ‘मातोश्री’ इमारत उभारली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या नव्या पिढीसाठी कलानगरमध्येच ‘मातोश्री-२’ ही सहा मजली इमारत उभारत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे गेली अनेक दशके ‘मातोश्री’ आकर्षणाचे केंद्र बनले. शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान बनलेल्या या मातोश्री निवासस्थानासमोरच ‘मातोश्री-२’ ही वास्तू उभारण्यात येत आहे. तब्बल १० हजार चौरसफुट जागेवर नवीन सहा मजली इमारत उभारण्याचे काम सुरु आहे. मातोश्री-२ मध्ये दोन ट्रीप्लेक्स फ्लॅट्स आणि दोन माळ्याच्या उंचीचे हॉल्स असणार आहेत. प्रत्येक फ्लॅट मध्ये पाच बेडरूम आणि स्टडी रुम असेल. प्रसिद्ध वास्तुविशारद ‘तलाटी अँड पानथकी’ यांनी या मातोश्री-२ चा आराखडा तयार केला आहे.एकेकाळी प्रसिद्ध चित्रकार के.के. हब्बर यांचे इथे वास्तव्य होते. १९९६ साली हेब्बार यांच्या निधनानंतर ही जागा त्यांच्या वारसांकडे गेली. २००७ साली हेब्बार यांच्या वारसदारांनी सुमारे साडेतीन कोटींना ही जागा ‘प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला विकली. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी प्लॅटीनम कंपनीकडून ही जागा विकत घेतली असून त्यासाठी सुमारे ११ कोटी ६० लाख मोजल्याची माहिती सुत्रांनी दिली. जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबीयांनी ५ कोटी ८० लाख रुपये प्लॅटिनमला दिले, तर उर्वरित ५ कोटी ६० लाख इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे. शिवाय मुद्रांक शुल्कापोटी ५८ लाख रुपयेही ठाकरे कुटुंबीयांनी भरले. १७ आॅक्टोबर २०१६ रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)कलानगरवासीयांचा सुटकेचा नि:श्वासमातोश्री निवासस्थानाचे राजकीय वजन आणि सुरक्षेच्या कारणामुळे कलानगरमधील अन्य रहिवाशांची नेहमीच अडचण होते.रहिवाशांची ही तक्रार लक्षात घेत नव्या मातोश्री-२ या इमारतीची दुसरी बाजू बीकेसीच्या दिशेने उघडण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कलानगरमधील चिंचोळ््या गल्लीला पर्याय मिळणार आहे.