शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथूर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती

By admin | Updated: April 26, 2016 07:35 IST

आयपीएसच्या १९८१ च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आ

डिप्पी वांकाणी,

मुंबई- आयपीएसच्या १९८१ च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली, या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले. संजय बर्वे १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते. नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले सतीश माथूर हे महाराष्ट्रातील पहिले अधिकारी असून, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यानंतर ते सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे. महासंचालक म्हणून त्यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले. सीबीआयमध्ये असताना मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभागा होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.आयपीएस अधिकारी विजय कांबळे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर एसीबीचे महासंचालकपद रिक्त होते. रश्मी शुक्ला यांची या महिन्याच्या प्रारंभी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाल्यामुळे राज्याच्या गुप्तचर विभागाचे आयुक्तपदही रिक्त झाले होते. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी नव्या नियुक्त्यांची माहिती ‘लोकमत’ला दिली. राज्यातील युवकांना कट्टरवादापासून परावृत्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे गुप्तचर विभागाकडे सर्वांचे लक्ष आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना सरकारकडून अद्याप कार्यमुक्ततेचे आदेश मिळालेले नाहीत. बोरवणकर यांनी नवा पदभार स्वीकारल्यानंतर विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक तसेच महासंचालक व महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक ही दोन पदे रिक्त राहतील. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला तिथेही अधिकाऱ्याचाही शोध घ्यावा लागेल.