शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या मिनी ट्रेनला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त?

By admin | Updated: May 21, 2016 05:29 IST

पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली माथेरानची मिनी ट्रेन गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई : पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली माथेरानची मिनी ट्रेन गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेकडून सुरक्षेचे उपाय योजण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने काही उपाय सुचविले असून त्याची अंमलबजावणी रेल्वेकडून केली जाणार आहे.दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आमच्याकडून प्रथम अमन लॉज ते माथेरान ट्रेन सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद होणार नाही. सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तीन लोको आणि एअर ब्रेकसह दहा कोचेस तयार केले जात आहेत. त्याचप्रमाणे माथेरानच्या घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची काँक्रीटची भिंतही ट्रॅकच्या बाजूला बांधण्यात येईल. त्यामुळे दुर्घटना टाळता येणार आहे, असे स्पष्ट केले. मिनी ट्रेन घसरण्याच्या घटना घडल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने कामात हलगर्जी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एका स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, सुरक्षा समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालातून काही सूचना करण्यात आल्या आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे मिनी ट्रेनला एअर ब्रेक बसविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आतापर्यंत मिनी ट्रेनसाठी मॅन्युअली (मानवी) ब्रेकची हाताळणी होत होती. आता हे बदलून इंजीनमध्ये एअर ब्रेक प्रणाली बसविली जाणार आहे. यासह काही प्रक्रिया पार पाडून १0 जूननंतर म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवसांसाठी मिनी ट्रेन चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र मिनी ट्रेनचे काम आणि अन्य प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ती पावसाळ्यानंतरच चालविली जाऊ शकते. (प्रतिनिधी)मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरली. या ट्रेनला एअर ब्रेक असता तर ब्रेक लावून होणारा अपघात टाळताही आला असता. मात्र मॅन्युअली (मानवी पद्धतीने) ब्रेक हाताळणी होत असल्याने अपघात टाळता आले नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. >१२७ अंशांच्या वळणामुळे त्रासमध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रेन ज्या मार्गावर धावते त्या मार्गावर काही ठिकाणी मोठे वळसे आहेत. एक तर सर्वात मोठा असा १२७ अंशातला वळणदार मार्ग असून तो मिनी ट्रेनसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्या मार्गावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.