शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान पोलिसांनी हरवलेल्या मुलाचा एक तासात घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 06:11 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये हजारो पर्यटक दररोज येत असतात. मुंबईपासून माथेरान हे जवळचे

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये हजारो पर्यटक दररोज येत असतात. मुंबईपासून माथेरान हे जवळचे पर्यटनस्थळ असल्याने मुंबई येथील पर्यटक जास्त प्रमाणात येतात. मालाड येथील दवे कुटुंब माथेरानला फिरण्यासाठी आले असता त्यांचा मुलगा हरवला. मात्र, माथेरान पोलिसांनी त्यास फक्त एक तासात शोधून काढले. यामुळे माथेरान पोलिसांचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.या मुलाचे नाव अंश तुषार दवे (९) असून दवे हे कुटुंबासह मंगळवार, २ मे रोजी माथेरान येथील हॉटेलमध्ये उतरले होते. दुसऱ्या दिवशी बुधवार, ३ मे रोजी सकाळी १० वाजता हॉटेलचा चेक आऊट करून बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गेले होते, तिथून अंश हरवला. मुलाचा सर्व बाजारपेठेमध्ये शोध घेतला असता मुलगा कुठेच दिसत नव्हता. हवालदिल झालेल्या मुलाची आई कृष्णा व वडील तुषार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांनी या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक बाजारपेठेत पाठवले. एवढेच नाही तर सोशल मीडियाचा वापर करून गावकऱ्यांना संदेश पाठवून माहिती दिली असता दुपारी १२ वाजता पर्यटकांच्या सेवेसाठी असणारे निखिल शिंदे यांनी बाजारपेठेपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या अमन लॉज स्टेशन येथे या मुलाला पाहिले. मुलगा रडतरडत रेल्वे रुळावरून टॅक्सी स्टॅन्डकडे जात होता, तेव्हा निखिल याने त्या मुलाची समजूत काढून त्या मुलास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्या आई- वडिलांना बाजारपेठेतच त्या मुलाला सोपविले. त्यामुळे निखिल शिंदे या तरु णाचे, पोलिसांचे कौतुक होत आहे.(वार्ताहर) माथेरान हे पर्यटन स्थळ आहे. येथे हजारो पर्यटक निसर्गाची मजा लुटण्यास येतात. तेव्हा त्यांनी निसर्गाची मजा घेत असताना आपल्या कु टुंबाकडे विशेषत: लहान मुलांकडे लक्ष द्यावे. येणाऱ्या पर्यटन हंगामासाठी हे पोलिसांकडून आवाहन आहे.- राजवर्धन खेबुडे, उपनिरीक्षक