शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

गणित, विज्ञान आॅलिम्पियाड कार्यशाळा

By admin | Updated: July 20, 2016 04:25 IST

गणित आणि विज्ञानाची भीती कमी व्हावी, त्यांना या विषयांची गोडी लागावी, यासाठीची कार्यशाळा नुकतीच डोंबिवलीत टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली.

डोंबिवली : शालेय मुलांमधील गणित आणि विज्ञानाची भीती कमी व्हावी, त्यांना या विषयांची गोडी लागावी, यासाठीची कार्यशाळा नुकतीच डोंबिवलीत टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली. एमकेसीएलच्या महाराष्ट्र आॅलिम्पियाड मूव्हमेंटतर्फे ती घेतली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध आॅलिम्पियाड स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढवणे, हा त्याचा मूळ हेतू आहे. विज्ञान व गणित प्रसाराचा कार्यक्रम गेली नऊ वर्षे राबवला जातो. या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र आॅलिम्पियाड मूव्हमेंट’ ही राज्यव्यापी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यंदा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यांमधून या परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ३० हजारांहून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झाले. परीक्षेच्या पहिल्या फेरीत प्रत्येक जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थी राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र होतात आणि द्वितीय फेरीत राज्यस्तरावरील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. पाचवी ते दहावीतील प्रथम १२ म्हणजे ७२ विद्यार्थ्यांची कार्यशाळा पुण्यात होते. तशीच जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ७२ विद्यार्थ्यांची कार्यशाळा जिल्हा पातळीवर होते. ती टिळकनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडली. त्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे आयोजन एमकेसीएलच्या ठाणे जिल्हा लोकल लीड सेंटरतर्फे करण्यात आले. सेंटरचे इंद्रनील मयेकर, एमओएम प्रोग्राम समन्वयक सुधीर शेजवळ, समीर वारेकर आदी उपस्थित होते. ग्रामीण, शहरी आणि वनवासी अशा सर्व विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे. गरज आहे, संधीची. (प्रतिनिधी)