शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

पणन कायद्याविरोधात माथाडी एकवटले

By admin | Updated: January 13, 2016 01:23 IST

पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटा बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगार एकवटले आहेत. माथाडी कामगारांना उद्ध्वस्त कराल तर हे सरकार

नवी मुंबई : पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटा बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगार एकवटले आहेत. माथाडी कामगारांना उद्ध्वस्त कराल तर हे सरकार उद्ध्वस्त करण्यास कामगार व व्यापाऱ्यांना वेळ लागणार नाही, असा इशारा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी येथे दिला.नवी मुंबई बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी निषेध सभेत झाली. पाचही मार्केटमधील बाजारपेठा बंद ठेवून माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त केला. पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटाही एपीएमसीच्या मक्तेदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही भागात जाऊन कृषी माल विकण्याची मुभा मुक्त अर्थव्यवस्थेत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी शेतमालाची थेट विक्री होईल, शेतीमालाला चांगला भाव मिळेल व त्यांचा फायदा शेतकऱ्याला होईल, असे केंद्र व राज्य सरकारचे म्हणणे असल्याचे फ्रूट मार्केट असोसिशनचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठीच बाजार समितीचा कायदा केलाअसून शेतकऱ्यांना संरक्षण हाचया कायद्याचा मुख्य उद्देशअसल्याचे भेंडे यांनी सांगितले.वेळ आली तर नाकाबंदी करू,असेही भेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)दिल्लीवरून आखला जातोय डाव१९६३ साली बाजार समितीचा कायदा अस्तित्वास आला, त्यानंतर १९८६ साली त्यास मान्यता मिळाली. शासनाचा १९९६ साली लिखित करार झाला. त्यानंतर दिल्लीवरून हा नवा डाव आखून शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विकण्याचे नवे धोरण लादण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे द फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल मर्चंटचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी सांगितले.माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास शरद पवार यांनी कायम अग्रक्रम दिला आहे. नवे सरकार व्यापारी व कामगारांना विश्वासात न घेता परस्पर बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. राज्य सरकार जोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. - नरेंद्र पाटील, आमदार