शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
4
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
5
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
6
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
7
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
8
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
10
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
11
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
12
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
13
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
14
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
15
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
16
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
17
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
18
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
19
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
20
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक

पूर्व विदर्भात वाढले माता मृत्यूचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 04:04 IST

माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले

सुमेध वाघमारे / नागपूरमाता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २०११-१२मध्ये माता मृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६ मध्ये २५६वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रमाण जास्त असल्याचे वास्तव आहे.हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटु सत्य नाकारता येत नाही. सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सर्वात कमी  मृत्युदर गुजरातमध्ये इतर राज्याच्या तुलनेत सर्वात कमी माता मृत्युदर गुजरातमध्ये आहे. केंद्राची ‘चिरंजीवी’ योजना येथे प्रभावीपणे राबविली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात राज्य सरकारनेही मदत केली आहे. डॉक्टरला एका रुग्णामागे ३ हजार ८०० रुपयांची मदत मिळते. यात रुग्णांच्या पोषणापासून ते त्याच्या औषधांचा खर्च संबंधित डॉक्टरमार्फतच केला जातो. यामुळे रुग्णांना योग्य उपचारही मिळतो. याशिवाय ग्रामीण भागात इस्पितळ उघडण्यास पाच लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. विशेष म्हणजे आठ मिनिटांच्या आत दारासमोर उभी असणारी रुग्णवाहिका ही जमेची बाजू आहे.माता मृत्यू रोखण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ आवश्यकमहाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा ‘पॅटर्न’ आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यासाठी स्वतंत्र केडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास तरच जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. - डॉ. नोझेर शेरियार, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ.