शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्हात्रे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ठपका

By admin | Updated: February 27, 2017 03:57 IST

मनोज म्हात्रे यांच्या हत्येला गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा

भिवंडी : महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येला गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अर्थसंकल्पी अधिवेशनात करणार आहोत. या प्रकरणी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी मागणीही करणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. हल्ल्यातील प्रमुख आरोपी प्रशांत म्हात्रे याला पळण्यासाठी आमदार, खासदार यांनी मदत केली, असा थेट आरोपही त्यांनी केला. खासदार कपिल पाटील यांच्यासोबत आरोपी प्रशांतचे फोटो त्यांनी पत्रकारांना दाखवत हत्येमागचा संबंध सूचित केला.म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची रविवारी त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा त्यांनीही पत्रकारांशी बोलताना दिला. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रमुख आरोपीला अटक झाली नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून सरकार आणि पोलिसांचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपात आज सरसकट गुंडांना प्रवेश दिला जात असल्याने त्यांची हिम्मत वाढत आहे. गुन्हेगारांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचे विखे-पाटील यांनी नमूद केले. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हात्रे यांच्या हत्येमुळे भिवंडी शहरात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (प्रतिनिधी)