शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवनासमोर रंगली फुटबॉल मॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:26 IST

एरवी राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे विविध पक्षांचे आमदार आज चक्क मैदानात उतरले आणि त्यांनी फुटबॉल मॅचच्या आनंद लुटला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुमासदार शैलीतील कॉमेन्ट्रीने रंगत आणली.

विशेष प्रतिनिधी  मुंबई : एरवी राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे विविध पक्षांचे आमदार आज चक्क मैदानात उतरले आणि त्यांनी फुटबॉल मॅचच्या आनंद लुटला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुमासदार शैलीतील कॉमेन्ट्रीने रंगत आणली.१७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार असून, त्यादृष्टीने वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून आज विधान भवनासमोरील प्रांगणात अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हनमधील फुटबॉलचा सामना अध्यक्ष इलेव्हनने ४-२ असा जिंकला. फुुटबॉलपटूंच्या वेशात उतरलेल्या आमदारांच्या या मॅचचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावते समालोचन केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचा शुभारंभ केला. सामना सुरू होताच दोन्ही संघांत दहा ते अकराखेळाडू असल्यामुळे मैदानच अपुरे पडू लागले. फुटबॉल कमी आणि कुस्तीच जास्त... अशी परिस्थिती आल्याने विनोद तावडे यांनी मॅचरेफ्रीची भूमिका वठवत दोन्हीकडे सात-सात खेळाडू खेळविण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे आमदार नरेंद्र पाटील व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात हमरीतुमरी झाली. मात्र, आशिष शेलार यांनी मध्यस्थी करत खेळीमेळीच्या वातावरणात यावर पडदा टाकला.या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व मंत्री व सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विधान भवनाच्या बाहेर खास फुटबॉलसाठी मॅटचे मैदान बनविण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचे चिमटे अन् टोलेबाजीसामना सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या खुमासदार शैलीतील समालोचनातील टोलेबाजीने खेळात रंगत आणली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये पेनल्टी किकवरून भांडण रंगले असता मुख्यमंत्र्यांनी आता कुस्तीचा सामना सुरू होईल, अशी शंकावजा टिप्पणी करताच हशा पिकला.त्यातच क्रीडा मंत्री विनोद तावडे मध्यस्थीसाठी आले असता, ‘आता तावडे क्रीडामंत्री सगळेच प्रश्न सोडवतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. तर रंगलेले भांडण आपण अध्यक्षांच्या दालनात सोडवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. खेळाडू पायाने कमी आणि पोटानेच जास्त खेळत आहेत, प्रकाश मेहतांची किक होती, पण त्यांचा नेम चुकला... अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. विजयी खेळाडूंना ५० हजारांचे बक्षीस आणि चॉकलेट मंदा म्हात्रे यांच्याकडून देण्यात येईल, अशी हास्याची पेरणीही मुख्यमंत्र्यांनी केली.