शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती

By admin | Updated: July 10, 2016 13:11 IST

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत  

कोल्हापूरात पंचगंगा पात्राबाहेर,  गगनबाबडा तालुक्यात सर्वाधिक १८९.५० मिमी पाऊस 

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 87 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबाबडा तालुक्यात 189.50 मि.मी पाऊस पडला आहे.  
 
धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामूळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 29 फूट 4 इंचावर पोहचली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर व भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 
मुळा नदीला पूर
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवार सकाळ सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार घाटघरला ३६० मिमी तर रतनवाडीला ३१५ मिमी पावसाची नोंद  झाली आहे. साकुर-मांडवे पुलापर्यंत पाणी पोहोचले असून, संगमनेर व पारनेर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार आषाढ सरी कोसळत असून मुळे नदीला मोठा पूर आला आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासात एक टी एम सी म्हणजे १ हजार दशलक्षघनफुट विक्रमी  पाण्याची वाढ झाली आहे.  सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे.  तालुक्यात पहाटे पासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून भंडारदरा धरण सायंकाळपर्यंत ४० टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा ८५० दशलक्षघनफुट इतका झाला आहे.
 
नाशिक
नाशिकमध्ये संततधार पाऊस, शहराचे जनजीवन विस्कळीत. गंगापुर आणि दारणा धरणातील पाणी पातळीत वाढ.नाशिक संततधार पावसामुळे गंगापूर धरण 36 टक्के तर दारणा धरण 42 टक्के भरले.
 

जुन्नर

जुन्नर तालुक्यातील ओतुरला ढग फुटी गुरव ठीके या भागातील  जमीन  वाहून गेली. मांडवी नदीला महापूर शेती  घरे बंगले  गुरे व गोठे पाण्यात. जुन्नर च्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचे थैमान. कुकडेश्वर येथील पुलाचा भराव गेला वाहून.  आदिवासी भागातील जवळपास 10  गावांची संपर्क यंत्रणा धोक्यात. घाटघर कडे कुकडेश्वर मारगे जाणारी एस. टी. बससेवा झाली बंद. 
 
खामगाव
जळगाव - जामोद तालुक्यातील आसलगाव येथे भिंत अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यु, पावसामुळे अनिल पाटील यांच्य घराची भिंत पडली, या घटनेत कमलाबाई हरिभाऊ नारखेडे या महिलेचा मृत्यू झाला.
 
चंद्रपूर
चंद्रपुरात इंडीका कार नाल्यात पडली. कोठारी ते येनबोडी दरम्यान किन्ही पुलावरुन जात असताना कार नाल्यात पडली. गाडीमधील चौघे बेपत्ता असून, तिघे शिक्षक आहेत. पोलीसांची शोध मोहीम सुरु आहे.