शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मैेत्रीचे नाटक करून तरुणीवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: January 9, 2017 04:51 IST

मैत्रीचे नाटक करून मादक द्रव्य पाजून, भार्इंदरमधील २९ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाण्याच्या एका

ठाणे : मैत्रीचे नाटक करून मादक द्रव्य पाजून, भार्इंदरमधील २९ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये, तसेच मुंबईतील पवई भागात घडली. या प्रकरणी आधी पवई आणि नंतर ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मुंबईतील एका दुकानात ही २९ वर्षीय पीडित तरुणी कामाला आहे. तिच्या दुकानात बॅग आणि काही सामान खरेदीच्या बहाण्याने गणपत पुरोहित रा. मुंबई यायचा. तिथेच त्यांची ओळख झाली. याचाच गैरफायदा घेत, त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक करीत तिला आधी पवई परिसरात नेले. नंतर, मार्च २०१३ मध्ये ठाण्याच्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये मादक द्रव्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. किशोर जैन आणि किरण जैन या त्याच्या मित्रांनीही त्याच्यासह पुन्हा त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यादरम्यान, त्यांनी अनैसर्गिक अत्याचारही करून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार २०१३ ते २०१६ या चार वर्षांच्या काळात सुरू असल्यामुळे, आपल्याला काहीच प्रतिकार करता आला नसल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत, तिने पवई पोलीस ठाण्यात ३ जानेवारी २०१७ रोजी तक्रार दाखल केली. संपूर्ण प्रकार ठाण्याच्या हॉटेलमध्ये घडल्याने, हे प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी वर्ग करण्यात आले आहे. फिर्यादीची चौकशी बाकी असल्याने, आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)