शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या मुकादमाकडून महिलेवर सामुहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 21:28 IST

बाहेरगावाहून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करीत तिला बळजबरीने दारु पाजून दोघाजणांनी बलात्कार करण्यात आल्याची घटना

ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि.31 - बाहेरगावाहून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करीत तिला बळजबरीने दारु पाजून दोघाजणांनी बलात्कार करण्यात आल्याची घटना धनकवडीमधील संत शंकर महाराज वसाहतीजवळील ज्ञानेश्वर सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सहकारनगर पोलिसांना जेव्हा पिडीत महिलेने बुधवारी सकाळी ही घटना सांगितली, तेव्हा तातडीने सुत्र हलवीत अवघ्या चार तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पिडीत महिलेवर उपचार सुरु आहेत. 
नवनाथ राम जाधव (वय 20, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी), खंडू बापू लोंढे (वय 32, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी लोंढे हा महापालिकेमध्ये मुकादम आहे. पिडीत महिला केटरींगमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. तिचे लग्न झालेले असून तिला तीन मुली आहेत. ही महिला रविवारी कामानिमित्त नगर जिल्ह्यातील नेवासे येथे गेली होती. मंगळवारी रात्री ही महिला बसने रात्री अकराच्या सुमारास शिवाजीनगरला उतरली. आॅटोरिक्षाने ती सातारा रस्त्यावर आली.  ज्ञानेश्वर सोसायटीजवळून ही महिला पायी चालत जात होती. त्यावेळी आरोपी लोंढे आणि जाधव सोसायटीच्या पार्किंगमध्ये दारु पित बसलेले होते. 
या महिलेला पाहिल्यावर आरोपींनी काही कळायच्या आतच तिच्या कपाळावर कठीण वस्तुने प्रहार केला. या महिलेला धरुन आरोपींनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेले. 
तिला खाली पाडत जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार सुरु असताना ही महिला आरोपींकडे विनवनी करुन आपल्याला तीन मुली असून मला सोडा अशी वारंवार विनंती करीत होती. मात्र, आरोपींना तिची दया आली नाही. त्यांच्या तावडीमधून कशीबशी सुटका करुन घेतलेल्या या महिलेने सोसायटीमध्ये जाऊन घरांचे दरवाजे वाजवले. मात्र, सुरुवातीला तिच्या मदतीला कोणीही आले नाही. काही वेळाने मोजके रहीवासी आले. त्यांनी पार्किंगमध्ये जाऊन पाहिले असता आरोपी पसार झालेले होते. 
रात्री ही महिला घरी गेली. बुधवारी सकाळी आईला घेऊ न भेदरलेली ही महिला सहकारनगर पोलीस ठाण्यात पोचली. वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेत आरोपींच्या मागावर पोलीस पथक रवाना केले. दरम्यान, आरोपींचा माग काढत असताना एका खब-याने हा गुन्हा लोंढेने केल्याची माहिती दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, जाधव यालाही पोलिसांनी जेरबंद केले. तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. थोरात हे करत आहेत. 
 
आरोपींपैकी अटक करण्यात आलेला खंडू लोंढे हा महापालिकेमध्ये मुकादम आहे. तर आरोपी नवनाथ जाधव याची आई महापालिकेमध्ये नोकरीस आहे. 
 
पिडीत महिलेचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असून तिला तीन मुली आहेत. तिच्या पतीचे काही वर्षांपुर्वी काविळीने निधन झालेले आहे. सध्या ही महिला सासुसास-यासह राहण्यास आहे.