शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान गावडे अनंतात विलीन

By admin | Updated: May 25, 2016 04:56 IST

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या त्यांच्या गावी मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- महादेव भिसे, आंबोली (जि. सिंधुदुर्ग)

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या त्यांच्या गावी मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. ‘वीर जवान पांडुरंग गावडे अमर रहे’, अशा घोषणांनी आसमंतही भावविव्हल झाला होता.गावडे यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता गोव्यातून आंबोलीत आले. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. त्यानंतर लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून आंबोली दूरक्षेत्रापासून गावडे यांच्या घरापर्यंत चार किलोमीटर अंत्ययात्रा काढण्यात आली. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. पार्थिव घरी पोहोचल्यानंतर नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले. दु:ख अनावर झाल्याने पाडुरंग यांच्या पत्नीची शुद्ध हरपल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.घरापासून जवळच असलेल्या शेतात अंत्यसंस्कार झाले. यावेळी लष्कराच्या जवानांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून अखेरची सलामी दिली. मुलगा प्रज्वल याने मंत्राग्नी दिला. सिंधुदुर्गवासियांना अभिमान- वीर जवान पांडुरंग गावडे यांचा सिंधुदुर्गवासीयांना अभिमान असून, त्यांच्या नावाने आंबोली- चौकुळ येथे उचित स्मारक बांधण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर शहीद गावडेंच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.