शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन तस्कर विमानतळावर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 00:20 IST

कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 20 - कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली होती.सत्यप्रकाश उर्फ सर्वेश मिश्रा (वय ३०) असे पोलिसांनी अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. तो मुंबईतील रहिवासी आहे. तो कोकेनची खेप घेऊन एक तस्कर इंडिगो फ्लाईट क्रमांक ४०३ ने मुंबईहून नागपूरकडे निघाला आहे. तो काळी टी शर्ट घालून आहे आणि २८ क्रमांकाच्या सीटवर बसला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोहचलेला हा तस्कर येथून परप्रांतात जाणार असल्याची माहितीही गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांना मिळाली. त्यावरून कदम यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर विमानतळावर पाठविले. या पथकाने बारकाईने पाहणी केल्यानंतर संशयास्पद अवस्थेत असलेल्या मिश्राला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ कोकेन आढळले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली. मिश्राला ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावरून गुन्हे शाखेत नेण्यात आले. तेथे त्याची वृत्तलिहिस्तोवर चौकशी सुरू होती. या संदर्भात विचारणा केली असता, आरोपी मिश्रा हा ५.३० च्या विमानाने नागपुरात आला. येथून तो विमानाने हैदराबाद येथे जाणार असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले असून, त्याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेक ग्राहकांची नावे उघडदरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोकेन तस्कराने नागपूर आणि हैदराबाद येथील अनेक कोकेन शौकिनांची नावे पोलिसांना सांगितल्याचे समजते. हे सर्व कोकेन शौकीन ग्राहक हायप्रोफाईल असून, यात काही बुकींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी सर्वेशने नागपुरात एक मोठी कोकेन खेप आणली होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.