मुंबई : नाल्यांच्या परिसरात राहणारे रहिवासी त्याचा कचराकुंडीसारखा वापर करीत असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे़ त्यामुळे नालेसफाईची मोहीम असफल होत असल्याने आता क्लीन अप मार्शल्सना नाल्यांवर नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे़ १ जूनपासून हा पहारा सुरू होणार असून नाल्यात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला दंडही ठोठावण्यात येणार आहे़मुंबईतील अनेक नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत़ तसेच नाल्यांच्या आजूबाजूला अनेक झोपड्याही उभ्या आहेत़ या वस्त्यांमधील रहिवासी नाल्यांमध्ये सर्रास कचरा टाकत असतात, अशी तक्रार अनेकदा पालिकेकडे आली आहे़ नाले कचऱ्याने भरत असल्याने मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका वाढतो़ त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन पालिका दरवर्षी करत असते़ अशा विनंतीला नाल्यांच्या परिसरातील रहिवासी दाद देत नसल्याने अखेर दंडात्मक कारवाईचा विचार पालिकेने सुरू केला आहे़ बंद पडलेले क्लीन अप मार्शल मोहीम १ जूनपासून पुनर्जीवित होत आहे़ या मोहिमेतील मार्शल्सना नाल्यांच्या परिसरातही तैनात ठेवण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे़ सतत कचऱ्याने भरणाऱ्या नाल्यांच्या परिसरात या मार्शल्सचा वॉच असेल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)>साफ केलेले नालेही कचऱ्यातमुंबईत ५६५ कि़मी़ लांबीचे नाले आहेत़ यापैकी अनेक नाल्यांच्या परिसरात लोकवस्ती आहे़ या परिसरातील नाल्यांची सफाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तो नाला कचऱ्याने भरल्याचे पालिका अधिकाऱ्यांना आढळून आले़ स्थानिक रहिवासी घरातील कचरा या नाल्यांमध्ये टाकत असल्याचे उजेडात आले आहे़दंडाचीही शक्यतामुंबईकरांना शिस्तीचे धडे देण्यासाठी असलेली क्लीनअप मार्शल्स मोहीम १ जूनपासून पुन्हा सुरू होत आहे़ सतत कचऱ्याने भरलेले असलेल्या नाल्यांच्या परिसरात या मार्शल्सना तैनात करण्याचा विचार सुरू आहे़ एकदा साफ केलेल्या नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला हे मार्शल्स दंड ठोठावतील़
नाल्यांवर आता मार्शल्सचा पहारा!
By admin | Updated: May 21, 2016 01:55 IST