शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

जबरदस्तीने केला तरुणीशी विवाह

By admin | Updated: July 20, 2016 03:29 IST

तरुणीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करून त्या तरुणीशी बळजबरीने विवाह करणाऱ्या तरुणावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाड : तरुणीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करून त्या तरुणीशी बळजबरीने विवाह करणाऱ्या तरुणावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडालेली आहे. पीडित तरुणी ही महाड तालुक्यातील शहरानजीक एका गावातील असून आरोपी अशोक रिंगे (३०) रा. किंजळोली, ता. महाड हा फरारी झाला आहे.अशोक रिंगे याने पीडित तरुणीशी ओळख काढून तिच्याशी मैत्री करीत त्याने तिचा विश्वास संपादन केला. २० आॅक्टोबर २०१२ रोजी रिंगे याने तिला रायगड मार्गावरील हॉटेल येलंगी येथे नेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळेत त्याने त्या बलात्काराचे चित्रीकरण केले. नंतर ही फित आणि छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सलग चार वर्षे हा प्रकार घडत राहिल्यानंतर अशोक रिंगे याने त्या तरुणीला बळजबरीने चिपळूण येथे नेले व विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीने सही घेत त्यांच्याशी नाटक केले.या प्रकरणी पीडित तरुणीने महाड येथील न्यायालयात याचिका दाखल करून अशोक रिंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर घटनेत तथ्य असल्याचे दिसून आल्यानंतर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक रिंगे याच्यावर विविध कलमानुसार कारवाई होत आहे. तपास पो. नि. आर.पी.शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)