शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:25 IST

होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेल्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन राहत्या घरी आत्महत्या केली. सोलापूरातील एका डॉक्टराच्या त्रासाला

- लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर (जि. सोलापूर) : होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेल्या विवाहितेने विष प्राशन करुन राहत्या घरी आत्महत्या केली. सोलापूरातील एका डॉक्टराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे, तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी डॉ. वीरेशकुमार जालादी याच्यासह पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा बापू पाखरे (२५)असे मृत महिलेचे नाव आहे़ ती सोलापूरच्या गांधीनाथा होमिओपॅथी या वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होती. तिला डॉ. जालादी हा वारंवार त्रास देत होता. याबाबत तिचे वडील पोपट दादा पवार व पती बापू ज्ञानदेव पाखरे हे त्यांच्या कुटुंबासह सोलापूर येथे डॉ. जालादी याला समजावून सांगण्यासाठी रविवारी गेले. त्याठिकाणी त्यांच्यात तू-तू मै-मै झाले. पुन्हा पाखरे व पवार कुटुंब पंढरपूर येथे आले. पूजा तिच्या पतीसह घरी गेली. त्यानंतर तिने किटक नाशक प्राशन केले. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पूजा आणि बापू पाखरे यांना साडेचार वर्षांची नावाची मुलगी आहे़ पोपट पवार यांनी पूजाला तिचे पती बापू पाखरे व सासू हे चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांंनी त्या दोघांवरही गुन्हा दाखल केला. सॉरी फॉर माय डॉटर... वीरेशकुमार जालादीमुळे मी आत्महत्या करीत आहे. तो मला त्रास देतो. फोन करतो. धमकी देतो. कॉलेजमध्ये बळजबरीने भेटायला बोलावतो. मला त्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. मला आता सहन होत नाही, म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून जात आहे. आई, आण्णा मला माफ करा. स्पेशली सॉरी फॉर माय डॉटर, असा मजकूर पूजाने चिठ्ठीत लिहून ठेवला होता.