शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला साडीचा आग्रह का? हायकोर्टाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 22:48 IST

आपण एकविसाच्या शतकात जगत असून या काळात विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे कालबाह्य विचारांचे लक्षण आहे असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 16 : आपण एकविसाच्या शतकात जगत असून या काळात विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे कालबाह्य विचारांचे लक्षण आहे असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.
 
उमेश व जयश्री असे प्रकरणातील पती-पत्नीचे नाव आहे. जयश्रीने नेहमी साडी नेसावी अशी उमेशची अपेक्षा आहे. जयश्रीने पंजाबी ड्रेस घालणे त्याला आवडत नाही. जयश्री पदवीचे शिक्षण घेत असून उमेश बँकेत नोकरीवर आहे. अशा परिस्थितीत पत्नीने साडी नेसण्याची अपेक्षा करणे योग्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीने अशा अनावश्यक अपेक्षा टाळल्या पाहिजे अशी समज दिली आहे.
 
उमेश व जयश्रीचे ८ मे २०११ रोजी लग्न झाले. उमेश नाशिक जिल्ह्यात अ‍ॅक्सीस बँकेत नोकरी करीत आहे. उमेशने जयश्रीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. १८ मे २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध जयश्रीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी वरील मुद्यासह अन्य विविध बाबींवर स्पष्ट निरीक्षण नोंदवून जयश्रीचे अपील मंजूर केले व कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.
 
 
उमेशने जयश्रीवर विविध गंभीर आरोप केले होते. जयश्रीचे वागणे चांगले नाही. ती संयुक्त कुटुंबात राहायला तयार नाही. ती क्षुल्लक कारणांवरून सासरच्या मंडळीचा अपमान करते. घरचे काम करीत नाही. माहेरच्या सदस्यांसोबत फोनवर बोलत राहते. ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार नसते. साडी नेसत नाही असे उमेशचे म्हणणे होते. जयश्रीने सर्व आरोप फेटाळून उमेशसोबत राहण्याची तयारी दर्शविली होती. उमेश जयश्रीला सासरी ठेवून ४५० किलोमीटर लांब नोकरी करतो. पतीच्या अनुपस्थितीत कोणतीही पत्नी सासरी राहण्यास तयार होणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उमेशच्या पर्समध्ये दुसºया महिलेचा पासपोर्ट फोटो सापडला होता. यावरून जयश्रीने भांडण केले होते. जयश्री घर सोडून गेली होती. संबंधित महिलेचा फोटो विम्याच्या कागदपत्रावरील असल्याचे स्पष्टीकरण उमेशने दिले होते. परंतु, त्याला स्वत:कडे बँकेच्या विमा विभागाचे काम असल्याचे पुरावे सादर करता आले नाहीत.