शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: November 2, 2016 06:28 IST

एका विवाहितेवर तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक बलात्काराची घटना जोगेश्वरीच्या श्यामनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री घडली.

मुंबई : दीड महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर भाड्याचे घर शोधत दिवसभर वणवण करणाऱ्या एका विवाहितेवर तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक बलात्काराची घटना जोगेश्वरीच्या श्यामनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री घडली. त्याच वस्तीत राहणाऱ्या आठ नराधमांना पोलिसांनी अल्पावधीत अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आठ जणांपैकी एक जण काही गुन्ह्यांत यापूर्वीही आरोपी आहे. बलात्कारित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे.हे दाम्पत्य भाड्याने घर शोधण्यासाठी सोमवारी जोगेश्वरी परिसरात आले होते. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करते. तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या महिलेला जोगेश्वरी परिसरात भाड्याने घर शोधण्यास सांगितले होते. घराच्या शोधात पीडित महिला पतीसोबत सोमवारी रात्री सहकारी महिलेच्या घरी आली होती. स्वत: रात्रपाळीला निघून जाताना या महिलेने त्या जोडप्याला रात्री तिच्याच घरी मुक्काम करण्यास सांगितले. ती महिला कामावर गेल्यानंतर रात्री या जोडप्याचे कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा आवाज घराबाहेर नशा करत बसलेल्या चरसी आणि गर्दुल्ल्यांनी ऐकला. त्यांच्यापैकी एक जण झोपडीत आला. त्याने या जोडप्याला शिवीगाळ सुरू केली. या महिलेने प्रत्युत्तर दिल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर या टोळक्यातील बाकीचे तेथे आले आणि महिलेच्या पतीला मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून त्याच्यादेखत पत्नीवर बलात्कार केला. आवाजाने रहिवासी जमू लागल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. बलात्कारित महिलेच्या पतीने तक्रार केल्यानंतर अवघ्या काही तासांत अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने आठही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)