शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

फसवून लग्न झालेली विवाहिता दोन वर्षांनी घरी

By admin | Updated: October 3, 2016 03:44 IST

उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या तरुणीशी पुण्यातील तरुण जुलै २०१४ मध्ये विवाहबद्ध झाला.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या तरुणीशी पुण्यातील तरुण जुलै २०१४ मध्ये विवाहबद्ध झाला. तिच्या वडिलांकडून हुंडा घेऊन तो तिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला फिरायला नेतो, असे कारण देऊन तिला मुंबईत घेऊन आला आणि तिला तेथेच सोडून फरार झाला. तो परत कधी फिरकलाच नाही. ती आली तेव्हा नववधूच्या वेशात असल्याचे रुग्णालयाने सांगितले. तिच्या शरीरावर कोड असल्याने तिला नाकारणाऱ्या कुटुंबीयांनी अखेर दोन वर्षांनी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयातून घरी नेले. मुंबईला भरकटत असताना देवनार पोलिसांनी ३२ वर्षीय विवाहित महिलेला ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला तिला विचारले असता, ‘मै घुमने आयी थी, गुम गयी’ असेच ती सांगत असे. तिच्याशी संवाद साधून मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा केसरकर यांनी तिचा पत्ता शोधून काढला. ती उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्याच्या लक्ष्मीपूर गावातील असल्याचे आढळून आले. या पत्त्यावरून तिच्या कुटुंबीयांचा शोध त्यांनी सुरू केला. या वेळी तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क केला असता तिच्या कुटुंबीयांची माहिती सहजगत्या मिळाली. केसरकर यांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधून तुमची मुलगी प्रादेशिक मनोरुग्णालयात असल्याची माहिती दिली. त्या वेळी तिला नेण्यास तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दाखवली. ज्याज्या वेळी प्रादेशिक मनोरुग्णालय तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यात्या वेळी ते तिला घरी घेऊन जाण्यासंदर्भात टाळाटाळ करीत असे. एकदा फोनवर तिच्या भावोजींनी सांगितले की, तिच्या शरीरावर कोड आहे आणि आमच्या गावात शरीरावर कोड असलेली महिला समोर आली, तर तिला अपशकुनी समजले जाते. परंतु, केसरकर यांनी तिच्या वडिलांचे आणि इतर नातेवाइकांचे वारंवार फोन करून समुपदेशन केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला २०१४ मध्ये दोन महिन्यांपासून मानसिक आजार झाला होता. तिला औषधोपचार केल्यावर ती बरी झाली. शेजारच्या गावात एक पुण्याहून मुलगा आला होता. त्याने तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. या वेळी तिच्या वडिलांनी लग्नाचा सर्व खर्च करून त्या मुलाला रोख रक्कम देऊ केली. लग्न झाल्यावर तो मुलगा तिला मुंबईला फिरायला नेतो. नंतर, आम्ही पुण्यात येऊ, असे सांगून तिला घेऊन गेला. यानंतर, तिला मुंबईतच सोडून फरार झाला. तिच्या वडिलांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन बंद येत होता.>समुपदेशनानंतर बदलसमुपदेशनानंतर अखेर तिचे वडील मदरसाचे काझी यांच्यासमवेत येऊन तिला काही दिवसांपूर्वी घरी घेऊन गेले. या रुग्णावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. ऋचा जोशी यांनी उपचार केले. या वेळी वरिष्ठ मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा वाठोरे यांचे मार्गदर्शन लाभले.