शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘विवाहित मुलीने पालकांचा सांभाळ करणे आवश्यक’

By admin | Updated: March 4, 2016 03:08 IST

मुलाकडून देखभालीचा खर्च मागताना विवाहित मुलगीही आर्थिकरित्या तेवढीच सक्षम असल्यास विवाहित मुलीनेही पालकांचा साभांळ करणे आवश्यक आहे

दीप्ती देशमुख,  मुंबईमुलाकडून देखभालीचा खर्च मागताना विवाहित मुलगीही आर्थिकरित्या तेवढीच सक्षम असल्यास विवाहित मुलीनेही पालकांचा साभांळ करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने पालकांना याचिकेत विवाहित मुलीला प्रतिवादी करण्याचे निर्देश देताना म्हटले.आनंद जाधव (बदल्लले नाव) यांनी त्यांचा मोठा मुलगा गोविंद जाधव (बदलले नाव) याच्याकडून देखभालीचा खर्च मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र गोविंद याने त्याच्यापेक्षाही त्याची विवाहित बहीण आणि धाकट्या भावाला जास्त उत्पन्न असल्याने पालकांनी त्यांच्याकडूनही देखभालीचा खर्च मागावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.आनंद जाधव यांच्या वकिलांनी गोविंद यांचे म्हणणे फेटाळले. ‘विवाहित मुलगी पतीच्या घरच्यांना सांभाळण्यासाठी बांधील असते. पालकांना सांभाळण्यासाठी नाही,’ असा युक्तिवाद जाधव यांच्या वकिलांनी केला. मात्र उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. ‘या केसमध्ये, विवाहित मुलगी अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असून तिचे उत्पन्न चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ती तिच्या पालकांचा सांभाळ करणे आवश्यक आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. ‘या केसमध्ये असे दिसून येते की, विवाहित बहीण आणि धाकटा भाऊ गलेलठ्ठ पगार घेऊनही त्यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आले नाही. पालकांचे केवळ मोठ्या मुलाशी आणि सुनेशी वाद असल्याने त्यांच्याकडूनच देखभालीचा खर्च मागण्यात आला आहे,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.