शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात आले विघ्न..!

By admin | Updated: May 13, 2014 03:57 IST

लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत.

मुंबई : लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत. गेल्या आठवड्यात वरातीत नाचण्यावरून चार ठिकाणी खून पडले असताना गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चार घटनांनी त्यात भर घातली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मधमाश्यांनी एका वºहाड्याचा बळी घेतला. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड झाली. सोलापुरात घोड्याने लाथ मारल्याने एक जण दगावला. जळगाव जिल्ह्यात लग्नमंडपाच्या पायपात विद्युतप्रवाह शिरल्याने एकाचा बळी गेला. लग्नासारख्या मंगल सोहळ्यात हा प्रकर झाल्याने समाजमन हेलावले आहे. मधमाश्यांचा हल्ला नागभीड (चंद्रपूर) : येनोली (माल) येथे वºहाडी म्हणून आलेल्या आणि पेरजागड (सातबहिणी डोंगर) हे पर्यटनस्थळ पाहायला गेलेल्या वºहाड्यांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेश महादेव हरडे या वºहाड्याचा मृत्यू झाला तर सात वºहाडी जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. येनोली (माल) येथे विनोद हरी बावणकर यांच्या दोन मुलांचे लग्नकार्य आटोपल्यावर त्यांचे नातेवाईक येनोलीपासून पेरजागड हे पर्यटनस्थळ जवळच असल्याने काही मंडळी ते पाहायला गेली. तिथे कोणीतरी मधमाश्यांच्या मोहोळाला डिवचल्याने मधमाश्यांनी हल्ला चढविला. गणेश हरडे (३६, रा. मूल) या वºहाड्यावर मधमाश्या अक्षरश: तुटून पडल्या. अंगभर चावा घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओम्कार विनोद मानापुरे (१३, रा. मूल), आशिष विजय ठवरे (२४) पवनी, यश विजय खेडीकर (१३, रा. भंडारा), अनुज अजय ठवरे (१४) अथर्व अजय ठवरे (१०, रा. पवनी) हे गंभीररीत्या जखमी झाले. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड नागपूर : रस्त्यावर मंडप टाकण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान लग्नमंडपात तोडफोड करण्यात झाले. या प्रकारामुळे लग्नघरी जमलेल्या मंडळींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. शेजार्‍यांनी धाव घेऊन आरोपींना कसेबसे आवरले. तक्रार नंदनवन ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली. दादाराव फत्तूजी अतकरी (वय ५२) हे आराधनानगरातील सिद्धेश्वर कॉलनीत राहतात. ते सिमेंटच्या चौकटी (दारांच्या फ्रेम, खिडक्या) बनवितात. मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांनी आपल्या घरासमोर मंडप घातला होता. बाजूलाच राहणार्‍या सय्यद असलम सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (२५) याने त्याला आक्षेप घेतला. ‘तेरे बाप की जगह है क्या’, असे म्हणत सय्यदने वाद घातल्यामुळे या दोघांमध्ये रविवारी दुपारी वाद झाला. ती कुरबुर सायंकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे अतकरी आणि त्यांचे नातेवाईक रवी जोगे हे दोघे रविवारी रात्री ८.३० वाजता लग्नमंडपात लग्नाच्या व्यवस्थेबाबत चर्चा करीत असताना सय्यद त्याचे वडील सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (५०), फारुख शेख करीम शेख (२५), निर्भय सुरेशसिंग ठाकूर आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी अतकरी तसेच रवीवर हल्ला चढवला. लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड घेऊन आरोपी मंडपात शिरले. आतमधील जेवणाचे टेबल-खुर्च्या, जेवणाचे पदार्थ फेकून प्रचंड हैदोस घातला. सोलापुरात घोडा भोवला कंदर (जि़ सोलापूर) : जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात रविवारी कामटे-सुरवसे व सुतार-पालवे असे दोन विवाह सोहळे होते़ सकाळी १० वाजता नवरदेवाची वरात काढण्यात आली. वरात विवाहस्थळी आल्यानंतर वाद्य वाजविण्याचे बंद झाले, परंतु एकाने अचानक हलगी वाजविताच घोडेवाल्याने घोडे नाचविण्यास प्रारंभ केला़ पहिला घोडा नाचायचा बंद होताच दुसरा घोडा नाचवत असताना भाऊसाहेब हनुमंत देवकर (२८) घोड्याच्या पाठीमागे आला़ तेव्हा घोड्याने त्याच्या छातीत लाथ मारली़ त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.