शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विवाह मुहूर्त १६ नोव्हेंबरपासून

By admin | Updated: November 7, 2016 01:11 IST

यंदा १६ नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक महिन्यात एकूण ८० मुहूर्त आहेत.

पिंपरी : यंदा १६ नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक महिन्यात एकूण ८० मुहूर्त आहेत. लग्न निश्चित झालेल्या कुटुंबीयांनी मंगल कार्यालये, आचारी, मंडप, बॅण्ड बुकिंगला आतापासूनच सुरुवात केली आहे. तुलसीच्या विवाहाला ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाल्यानंतर १६ पासून लग्नाचा मुहूर्त आहे. १६ नोव्हेंबर ते जुलै २०१७ अखेर एकूण ८२ मुहूर्त आहेत. गेल्या वर्षी मुहूर्त कमी होते. मे महिन्यांत तर एकच मुहूर्त होता. यंदा मात्र, नोव्हेंबरपासून जुलैपर्यंत प्रत्येक महिन्यात मुहूर्त आहेत. सर्वाधिक मुहूर्त मे आणि जून महिन्यात आहेत. विशेष म्हणजे या वर्षी शुक्र अस्त नसल्यामुळे लग्न सोहळ्या बरोबरच इतर शुभकार्येही नागरिकांना करता येणार आहेत. प्रत्येक महिन्यात लग्नतिथी असल्यामुळे वधू-वर कुटुंबीयांनी आपल्या सोयीनुसार लग्नाच्या तारखा आरक्षित केल्या आहेत. याबरोबरच शहरातील सर्व लहान-मोठी मंगल कार्यालये, लॉन्स यांचेदेखील बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यंदाचे मुहूर्त नोव्हेंबर - १६, २१, २२, २५, २६डिसेंबर- १, ३, ४, ५, ६, ८, १४जानेवारी -१७, १८, १९, २०, २३, २४, २९फेब्रुवारी - १, २, ३, ५, ६, ११, १३, १४, १६, १७, १९, २१, २८ मार्च -१, २, ५, ६, १०, ११, १४, १५, १६, १८एप्रिल - १७, १९, २०, २१ मे - ४, ७, ८, ९, १४, १६, १७, १८, १९, २१, २२, २३, २७, ३१ जून- २, ३, ५, ६, ८, १०, १२, १३, १५, १७, १८, १९, २०, २८, ३०जुलै - १, २, ३ तुलसी विवाहनंतर प्रत्येक महिन्यात मुहूर्त आहेत. मागील वर्षी शुक्र अस्त व कोकीळव्रत असल्यामुळे मुहूर्त कमी होते. यंदा मात्र कोणतेही शुक्र अस्त नाही.- सतीश मोरेश्वर कुलकर्णी, वाकडमुहूर्त अधिक असल्याने मंगल कार्यालयाचे बुकिंग झाले आहे. लग्न जमल्यानंतर बहुतांश नागरिक पहिल्यांदा कार्यालय बुकिंग करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वधू-वरांच्या मंडळीनीं आतापासून मंगल कार्यालय बुकिंग करून ठेवले आहे. - रामदास टेमघरे, मंगल कार्यालय चालक, थेरगाव. शहरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये असल्यामुळे मंडपाचा वापर कमी होतो. ग्रामीण भागात मात्र, मंडपातच कार्यक्रम होतात. यंदा मागील वर्षापेक्षा जास्त मुहूर्त असून, आतापासूनच वधू-वर मंडळीकडून मंडपची बुकिंग सुुरू झाली.- कुणाल वावळकर, मंडप अ‍ॅण्ड डेकोरेटर्स, वाकड.